Onion Merchant कांदा साठवणूकीचा संशय, व्यापाऱ्यावर धाडी

नाशिक जिल्ह्यातील काही महत्वाच्या कांदा व्यापाऱ्यावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. कांदा व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी आणि साठेबाजीच्या संशयावरून लासलगावमधील ४ बड्या कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या आहेत. या धाडी कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालय आणि कांदा साठवणुकीच्या खळ्यांवर एकाचवेळी टाकण्यात आल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले गेले आहे. दुसरीकडे सदर कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. Onion Merchant

आयकर विभागाने केलेल्या कारवाईत अधिकाऱ्यांनी चार ही कांदा व्यापाऱ्यांचे मागील पाच वर्षापूर्वीच्या व्यवहाराच्या तपशीलाचे कागदपत्रे तसेच कांद्याची असलेली साठवणूक तपासली असल्याचे समजते. कांद्याचे वाढलेले भाव, अतिवृष्टीने झालेले कांद्याचे नुकसान, नविन कांदा येण्यास होणारा विलंब यामुळे निर्माण होणारी तुट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात कांद्याचा साठा संपूष्टात आला आहे. त्यामुळे नफाखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त साठा केला आहे की काय, याची पडताळणी करण्यासाठी ही पथके आल्याचे समजते. देशांतर्गत कांद्याच्या दराला लगाम घालण्यासाठी आता कांदा साठवणुकीवरही नियंत्रयण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बाजार समितीकडून कांद्या आवक, विक्री आणि शिल्लकसाठा याबाबतचा दैनंदिन अहवाल मागविण्यात येऊन कांद्या साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

दुसरीकडे केंद्र सरकार व्यापाऱ्यांना ठरवून लक्ष्य करत आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करीत नाईलाजास्तव लिलाव बंद ठेवावे लागत आहे. आयकर विभागाच्या कांदा व्यापाऱ्यांवर धाडी पडत असतील तर कांदा कसा खरेदी करायचा व तो साठवायचा कसा व कोठे, असा प्रश्न एका कांदा व्यापाऱ्यानी उपस्थित केला आहे.Onion Merchant

आजचा कांदा भाव कृपया लिंक क्लिक करा
नाशिक शेतकरी वर्ग अडचणीत
Share this with your friends and family

You May Also Like

3 thoughts on “Onion Merchant कांदा साठवणूकीचा संशय, व्यापाऱ्यावर धाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.