व्यापाऱ्याने केली कांदा उत्पादक शेतकऱ्याला जबर मारहाण, उपचार सुरु

Share this with your friends and family

येवला : शुल्लक कारणाहून एका व्यापाऱ्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याला जबर मारहाण केली आहे. त्याला इतके मारले की उपचारासाठी त्याला दवाखान्यात दाखल कराव लागले आहे.हा प्रकार बाजार समितीच्या आवाराबाहेर व्यापाऱ्याच्या खळ्यावर घडला आहे. व्यापाऱ्याच्या या मुजोर वागण्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत असून संबधित व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

अनकुटे येथील शेतकरी वाल्मिक गायकवाड यांनी व्यापाऱ्याच्या खळ्यावर खरेदीसाठी आलेल्या मनमाड येथील व्यापाऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कांद्यावरून वांधा घातला होता. कांद्याच्या प्रतिवरून व्यापाऱ्याने कांदा खाली करण्यास नकार दिला होता. यावेळी व्यापारी व शेतकऱ्यामध्ये झालेल्या चकमकीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चोप देत कानशिलात लगावलेल्या थप्पडीने शेतकऱ्याला दुखापत होत उलटया झाल्या व ते काही काळ व्यापाऱ्यांच्या खळ्यावर बेशुद्ध अवस्थेत पडले.

गायकवाड यांना खाजगी रुग्णालयात त्याच्या नातेवाईक मित्रानी दाखल केले.दोन दिवस बाजार समितीची सुट्टी असल्याने हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. मात्र  बाजार समिती प्रशासनाने हा व्यापारी आपल्याकडील नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.