लासलगाव : कांदा लिलाव अजूनही बंद

कांदा लिलाव अजूनही बंदी
पोलिस प्रशासन व तहसिलदारांनी मध्यस्ती निष्फळ   
नाशिक : पाच सहा दिवसांपासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव बंद असून, आज पोलिस प्रशासन व तहसिलदारांच्या मध्यस्थीनंतर लिलाव पुर्ववत सुरु होवू शकले नाहीत. तर या बाबतचा निर्णय हा मुंबई येथे होणार आहे. पणनमंत्र्याबरोबर यासंदर्भात बैठक घेऊन ते देतील तो निर्णय मान्य राहील असे व्यापाऱ्यांनी सांगीतले आहे. दुसरीकडे बाजार समितीतील लिलाव बंद असताना व्यापाऱ्यांनी समितीच्या आवाराबाहेर सुरु केलेल्या परमपुज्य भगरीबाबा खरेदी केंद्राचे लिलावसुध्दा माथाडी कामगारांना देण्याच्या रोख  रक्कमेवरून बंद पाडण्यात आले होते. मात्र आज जे शेतकरी आपला माल घेवून आले होते त्यांचे काही प्रमाणत व्यवहार पूर्ण झाले मात्र, व्यापारी,शेतकरी आणि माथाडी कामगार यांच्यात अजूनही वाद कायम असून, लिलाव पूर्ण बंद आहेत.
शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे रोखीने नव्हे तर चेकनेच देऊ अशी भुमिका घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी माथाडींचे पैसे मात्र चेकने न देता रोखीने देण्याची भुमिका घेतली. तर आमचे पैसे आम्हाला चेकनेच द्या अशी मागणी करीत माथाडी कामगारांनी या खरेदी केंद्रातील लिलाव बंद पाडले होते.या बाबत आज झालेल्या बैठकीत स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय झाला नाही,तर २५ एप्रिल मंगळवारी पणनमंत्री, पणनसंचालक, बाजार समिती सदस्य आणि माथाडी कामगार संदस्य यांची बैठक होणार असून अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना विक्री झालेल्या शेतमालाचे पैसे लिलावानंतर २४ तासाच्या आत रोखीने वा एनईएफटीद्वारे देण्याची अट बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना टाकली. काही व्यापाऱ्यांनी ही अट झुगारून बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतकऱ्यांना चेकद्वारे पैसे देऊ असे सांगत नियमनमुक्तीचा आधार घेत परमपुज्य भगरीबाबा खरेदी केंद्र चालू केले होते. याठिकाणी आम्हाला काम द्या अशी मागणी माथाडी कामगारांनी केली. व्यापाऱ्यांनी काम देऊ पण पैसे रोख मिळतील असे सांगीतल्यावर माथाडी कामगारांनी आम्हाला आमच्या माथाडी मंडळाच्या नियमाप्रमाणे रोख रक्कम चालत नाही तर ती चेकद्वारेच चालते असा नियम असल्याचे सांगीतले. मात्र व्यापाऱ्यांनी आम्ही माथाडींची रक्कम रोख स्वरुपातच देऊ असा पवित्रा घेतल्याने संतापलेल्या माथाडी कामगारांनी या खरेदी केंद्रावरील लिलाव बंद पाडले. पोलिस प्रशासन व तहसिलदारांनी यावर मध्यस्थी करीत जिल्हा उपनिबंधकांशी चर्चा करून पणनमंत्र्याबरोबर या प्रश्नावर तातडीने चर्चा करून मार्ग काढण्याचे तो देतील तो निर्णय मान्य करावा या आश्वासनाबरोबरीने लिलावात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांची अडवणुक होऊ नये म्हणून खरेदी केंद्रावर असलेल्या शेतकऱ्यांचे लिलाव माथाडींनी पार पाडून दिले.मात्र अजूनही वाद कायम असून लिलाव बंद आहेत.

बंदचा परिणाम .

  1. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव २० एप्रिलपासून आहे बेमुदत बंद ;मात्र १९ एप्रिलपासूनच  अनेक व्यवहार बंद.
  2. पाच दिवसांपासून बंद असल्याने कोट्यावधीचे व्यवहार ठप्प .बाजार समितीतील चारशेहून अधिका हमाल मापारी यांच्यावर उपासमारीची वेळ .

    नियमन मुक्ती आदेशानंतर व्यापाऱ्यांकडून राज्यामध्ये प्रथमच कांदा खरेदी केंद्र लासलगाव येथे सुरु , मात्र चेक द्वारेच या केंद्रावर व्यवहार सुरु

  3. बाजार समितीत  दररोज १२०० ते १५०० वाहनाचा लिलाव होत असतो .मात्र व्यापा-यांच्या कांदा खरेदी केंद्रावर ३०० ते ४०० वाहनातून होतो कांदा खरेदी .
  4. कोणत्या कोणत्या कारणामुळे बाजार समितीचे अनेक वेळा लिलाव बंद होत असल्याने आशिया खंडातील मोठी अशी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगावच्या नावलौकिकास पोहचत आहे ठेच.
  5. लासलगाव सह परिसरातील गावांच्या बाजार पेठेवर याचा परिणाम झाला
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.