‘प्रभू’ कृपा : कांदा निर्यात प्रोत्साहन अनुदानात वाढ; चांगला भाव मिळण्याच्या आशा पल्लवित

Nashik / Agronomy

शेतकऱ्यांनी दोन ते तीन महिन्याहून अधिक काल साठवून ठेवलेल्या लाल कांद्याला भाव मिलानेस झाला आहे. सोबतच नवीन येणाऱ्या लाल कांद्याचेही खरे दिसत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती विचारण्याजोगीही नसण्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. योजना आयोगाच्या व्यापार-निर्यात अंतर्गत मंजूर केलेले प्रोत्साहन अनुदान 5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. केंद्राच्या या धोरणामुळे नवीन कांद्याला चांगला व मिळण्याच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. onion export subsidies increased central government commerce minister suresh prabhu

नवीन कांद्यालाही भाव मिळणे दुरापास्त झाल्यावर शेतकऱ्यांनी रत्यावर आंदोलनास सुरुवात केली होती. कांदे रत्यावर फेकले होते. काही शेतकऱ्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना मनी ओर्डर पाठवत अनोखे आंदोलन छेडले होते. शेतकरी-व्यापारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन कांदा निर्यात अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थमंत्री अरुण जेत्लिओ यांना पत्र लिहिले होते. कांद्याला वित्त साहाय्य करावे असे त्यांनी नमूद केले होते. निर्यात अनुदान वाढवल्यामुळे पाकिस्तानसह अन्य निर्यातदार देशांच्या तुलनेत भारतीय कांदा परदेशात स्वस्त उपल्स्भ होऊन स्थानिक मागणी आणि पुरवठ्यात समतोल येऊन भाव योग्य ठिकाणी स्थिरावण्यात मदत होणार आहे.

onion export subsidies increased central government commerce minister suresh prabhu
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.