इतर राज्यांना कांदा निर्यातीला परवानगी हा महाराष्ट्रावर अन्याय

लासलगाव/ नाशिक : कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतांना केंद्र शासनाकडून इतर राज्यांना कांदा निर्यात करायला परवानगी देण्यात येते. पण महाराष्ट्राला परवानगी देण्यात येत नाही. इतर राज्यांना कांदा निर्यातीला परवानगी हा महाराष्ट्रावर अन्याय असल्याची टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. Onion Export injustice Maharashtra

कांदा साठवणुकीबाबत केंद्राची अधिसूचना जारी केली असून किरकोळ व्यापाऱ्यांना २ टन आणि घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन कांदा साठविण्यासाठी परवानगी दिली आहे.

येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही साठवण मर्यादा लागू राहणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे’ असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. Onion Export injustice Maharashtra

भुजबळ यांनी शनिवारी (दि.२४) निफाड तालुक्यातील बोकडदरा येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे. सर्वच प्रकारच्या कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. पण राज्यसरकार तुमच्या पाठीशी आहे.

अतिवृष्टी नूकसान भरपाईसाठी घोषित केलेली मदत लवकरात लवकर देऊ असे आश्वासन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना दिले.

यावेळी केंद्रसरकारने कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी घेतलेल्या कांदा आयातीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर छगन भुजबळ यांनी टीका देखील केली. Onion Export injustice Maharashtra

कांदा बाहेरून आयात केला जात असताना महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांवर मात्र इनकम टॅक्स च्या धाडी टाकल्या जात आहेत. त्यामुळे हे केंद्र सरकार नेमकं कोणासाठी काम करतय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने परदेशातुन येणाऱ्या कांद्यावर निर्बंध ठेवले नाही. पण भारतातील कांद्याला मात्र निर्बंध ठेवले आहे. व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केल्यानंतर तो बाजारात आणण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि मुख्य म्हणजे कोरोनामुळे व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करता आला नाही. त्यामुळे केंद्र सरकार चुकीचे धोरण राबवत असल्याची टीका देखील भुजबळ यांनी केली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.