कांदा निर्यातीला केंद्राचे ५ टक्के अनुदान; होळकरांची मागणी मान्य

लासलगांव (वार्ताहर) समीर पठाण

कांदा निर्यातीस चालना देणेसाठी केंद्र शासनाने कांदा निर्यातदारांकरीता निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) अंतर्गत आज (दि. 14) शासनाने कांदा निर्यातीला ५ टक्के अनुदान जाहीर केले आहे. अनुदान लागु करावे अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली होती. Onion export five percent subsidy center government holkar lasalgaon

केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे विदेश व्यापार महानिदेशालयाने प्रसिध्द केलेल्या सार्वजनिक सुचनेनुसार भारतातुन सुकविलेल्या कांद्याची निर्यात करणा-या निर्यातदारांना 05 टक्के निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) लागु केली आहे. Onion export five percent subsidy center government holkar lasalgaon

कांदा निर्यातदारांना 05 टक्के कांदा निर्यात प्रोत्साहन योजना (MEIS) लागु करून सदर योजना 12 जानेवारी 2019 पर्यंत राहणार आहे. याबाबत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने वाणिज्य मंत्रालयाकडे पाठपुरवठा केला होता.

Onion export five percent subsidy center government holkar lasalgaon
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.