पेठ रोड : तेलंगवाडीत तरुणाची हत्या, पाच संशयितांना अटक

नाशिक : बुधवारी (दि.13) सकाळी 9 वाजता पेठ रस्त्यावरील तेलंगवाडी परिसरात पाच ते सात जणांच्या टोळक्याने एका 25 वर्षीय तरुणाची चॉपरने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. One Murdered Peith Road Telangwadi Nashik Panchavati Police Station

घटना घडल्यानंतर केवळ तासाभराच्या आत लांचावती पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून मागील भांडणाचे कारण असून कट करून हा हल्ला घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

One Murdered Peith Road Telangwadi Nashik Panchavati Police Station, तेलंगवाडी खून हत्या अनिल गुंजाळ anil gunjal पंचवटी पोलीस  नाशिक crime news

अनिल सुखलाल गुंजाळ (वय 25 रा. वैशाली नगर, पेठ रोड, पंचवटी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. One Murdered Peith Road Telangwadi Nashik Panchavati Police Station

पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार, गुंजाळ याचे नातेवाईक असलेल्या जयराम नामदेव गायकवाड, श्रीराम नामदेव गायकवाड, सुरेश जयराम गायकवाड, दशरथ नामदेव गायकवाड यांचा काल सुद्धा वाद झाला होता. हा वाद पोलिसात तक्रार दाखल करण्यापर्यंत गेला होता. पंचवटी पोलीस ठाण्यात याबद्दल दोन्ही बाजूने एनसी सुद्धा घेण्यात आली होती.

मात्र आज सकाळी मयत गुंजाळ तेलंगवाडीच्या लक्ष्मणनगर येथून जात असताना एका संशयित महिलेने त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत हल्ला केला. त्यानंतर वाद सुरू झाला असता जयराम नामदेव गायकवाड, श्रीराम नामदेव गायकवाड, सुरेश जयराम गायकवाड, दशरथ नामदेव गायकवाड यांनी अनिल वर चॉपर आणि चाकूने जोरदार वार केले. या हल्ल्यात अनिल गुंजाळ हा जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विभाग 1 चे सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम अजूनही सुरूच आहे.

One Murdered Peith Road Telangwadi Nashik Panchavati Police Station
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.