बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद २१ ला 

नाशिक :सध्या बांधकाम क्षेत्रात शासकीय  नियमावली, नविन कर प्रणाली तसेच अनेक सुधारणा व बदल होत असल्याने हे क्षेत्र सुद्धा परिवर्तनातून जात आहे.  या सर्वांबाबत सखोल चर्चा करण्यासाठी तसेच तज्ञ व वरिष्ठांकडून या बाबत मार्गदर्शन घेण्यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे येत्या २१ जुलै रोजी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेस राज्यभरातून बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदार उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे आयोजक नाशिक शाखेचे अध्यक्ष गोपाल अटल यांनी दिली.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात हायब्रीड अॅन्यूटीच्या माध्यमातून ३०००० कोटींच्या रस्ते निर्माणाचे काम सुरु आहे. नविन शासकीय योजना जसे की, प्रधानमंत्री आवास योजना, कमी उत्पन्नाच्या नागरिकांकरिता गृहनिर्माण (EWS / LIG) च्या  ८० आय बी च्या योजना, म्हाडा व सार्वजनिक बांधकाम विभाग च्या गृहनिर्माण व रस्ते बांधणी योजना  यामधील उपलब्ध संधी व येणा-या अडी अडचणी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येईल.
बांधकाम क्षेत्र हे कृषी नंतरचे सर्वाधीक रोजगार देणारे भारतातील महत्वाचे क्षेत्र असून २०२२ पर्यंत सर्वाना घरे या केंद्रसरकारच्या उद्दिष्टामुळे अनेक संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्रात १९,४०,००० घरे बांधण्याचे महाराष्ट्र सरकारचे लक्ष आहे.
सदर परिषदेस राष्ट्रीय अध्यक्ष ए. पुहाझेंडी, पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष प्रताप साळुंके हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. परिषदेनंतर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नवनियुक्त महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास बिरारी व त्यांचा टीमचा पदग्रहण सोहळा होणार आहे.

  २१ जुलै रोजी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात सकाळी ११.०० वा या परिषदेचे उद्घाटन होणार असून परिषदेस बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार यांची उपस्थिती राहील असा विश्वास गोपाल अटल यांनी व्यक्त केला.  परिषदेसाठी माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, रामेश्वर मालानी, संजय पाटकर, अरविंद पटेल, मोहन कटारिया, राहुल सूर्यवंशी ,​भूपेंद्र लाल, दीपक धाराराव आदी सदस्य प्रयत्नशील आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.