आता मी सर्वोच्चपदाचा विचार सोडून दिला- शरद पवार

शेतकरी कर्ज माफी दिली पाहिजे

नाशिक :सरकारने आता मोठे निर्णय घेणे  गरजेचे झाले आहे. शेतकरी कर्ज माफी दिली तर पाहिजेच ते देणार नसतील तर शेतीमालाला उठाव देणारा हमीभाव द्यायलाच हवा असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलें आहे. संसदीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.काँग्रेसमध्ये असताना काही विषयांवर स्पष्ट भूमिका घेतल्यानं देशातलं सर्वोच्च पद हुकल्याची खंत शरद पवारांनी व्यक्त केलीये. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यातल्या प्रकट मुलाखतीत पवारांनी आपलं मन मोकळं केलं. आता आकड्यांचं गणित जुळत नसल्यानं आता मी सर्वोच्चपदाचा विचार सोडून दिल्याचं पवार यांनी म्हटल आहे.सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाला नुकतीच नाशिकमधील सावरकरनगर येथील विश्वास लॉन्स येथे घेण्यात आली होती.

लेखक अंबरिश मिश्र, निवेदक सुधीर गाडगीळ आणि सामाजिक कार्यकर्ते व दत्ता बाळ सराफ शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विश्वास बॅँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी, कै. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, सपकाळ नॉलेज हब, सारस्वत बॅँक यांच्यावतीने या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयीन जीवनात महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाच्या नेतृत्वाचे स्वप्न बघितले नाही, मात्र यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श झ्यासमोर होता. त्यांच्या उद्याच्या महाराष्ट्राची भूमिका मला भावली. महाराष्ट्राने मला भरभरून दिले, मात्र त्यातही नाशिककरांचा मोठा वाटा आहे. सोन्याच्या साखळ्या अन् अंगठ्या घालणाऱ्या पुढा-यांपासून मी नेहमीच लांब राहतो. मुंबईचे डबेवाले हे जास्त करून नाशिकचे, हे नाशिकचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान माणसं माझी आहेत, त्यांचा मला अभिमान वाटतो.

खेळाडू आणि त्यांच्या सुविधा ही माझी जबाबदारी मी मानली. मुंबई क्रिकेट क्लबला कर्जमुक्त करून मी पद सोडले. ब्रॅडमन यांच्या विक्रमापेक्षा भाऊसाहेब निंबाळकर यांनी केवळ तीन धावा कमी काढल्या. त्यांना 50 हजार रुपये पेन्शन सुरू केली. जुन्या खेळाडूंना प्रतिष्ठा व सन्मान मिळवून दिला.

विधानपरिषदचे सभापती दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री विनायकदादा पाटील, माजी आमदार हेमंत टाकले, आमदार दिलीप बनकर, विश्वास ठाकूर, कैलास कमोद आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.