वाघ म्हातारा झाला, म्हणून गवत खाणार नाही – छगन भुजबळ यांची टीका, पक्ष सोडणार नाही

वाघ म्हातारा झाला, म्हणून गवत खाणार नाही, कुणी बंदर बोलतंय बंदर म्हातारा झाला तरी गुलाटी मारायला विसरत नाही, हे उद्गार आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 20 वा वर्धापनदिन. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील हल्ला बोल यात्रेचा समारोप पुण्यातील मेळाव्यानं झाला.मी जेलमधून बाहेर आल्यानंतर पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या, पण पवार साहेबांना सोडून कसा जाईन? अशा शब्दात छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला.

जवळजवळ अडीच वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा आक्रमक होत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. न्यायदेवतेचे आभार मानत त्यांनी निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. दोन वर्षांपूर्वी माझ्यावर खूप हल्ले झाले. सात सात वेळा धाडी टाकल्या. कारण नसताना तुरुंगात टाकले. जिथे भुजबळ नाव असेल तिथे धाडी टाकल्या. मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर झाला. सापडले काहीच नाही पण बाहेर भरपूर सांगितले, असे त्यांनी स्पष्ट केले.

“मैं जिंगदी का साथ निभाता चला गया”, हे गीत म्हणत भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भावना व्यक्त केल्या. देशात चार शहरांची नावे सांगा जी चार वर्षात स्मार्ट झाली, चार जिल्हे सांगा जिथे तुम्ही स्वच्छतागृह बांधली, चार जिल्हे सांगा जिथे वीज पुरवली आहे, पाणी पुरवले आहे, रस्ते नीट केले आहे. गंगा नदीला हे स्वच्छ करणार होते…चार पाऊले तरी गंगा साफ झाली का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. १७ टक्के आरक्षण शिल्लक आहे त्यात ७०० जाती आहेत. त्यामुळे आरक्षण वाढवा हीच मागणी आहे. यासाठी आंदोलन करण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली.

जेलमधून मी आणि समीर बाहेर आलो, आता खायचं काय ही चिंता होती. मात्र पाहतो तर काय? कुटुंबातील प्रत्येकाच्या खात्यावर 15-15 लाख जमा. अशा शब्दात मोदींच्या काळ्या पैशाविरोधातील मोहिमेवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींच्या स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडियानंतर आता रुईनअप इंडिया दिसेल की काय अशी चिंता वाटते असंही भुजबळ म्हणाले. 

महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासाठी मी कंत्राटदार नेमला नव्हता, इतकंच काय त्यावेळी मी मंत्रीही नव्हतो. 100 कोटी रुपयांचा माझा बंगला आहे, सगळं अटॅच केलं, मात्र लोकांचं प्रेम अटॅच नाही करु शकले, अशा शब्दात भुजबळांनी सरकारवर शेलकी टीकाही केली. म्हैस होती पाच फुटांची गाभण, आणि रेडकू निघालं 15 फुटांचं अशी परिस्थिती निर्माण केल्याचंही आपल्या मिश्किल शैलीत भुजबळांनी सांगितलं.


काय काय म्हणाले छगन भुजबळ पुण्यातील मेळाव्यात-

– ठोकर लागली की ती तुटते, मात्र ठोकर लागल्यानंतर येते ती कामयाबी : छगन भुजबळ
– बचेंगे तो और भी लढेंगे, हम बचेंगे भी और लढेंगे भी : छगन भुजबळ
– मी जेलमध्ये असताना आठवड्यातून तीनदा माझे घरचे साहेबांच्या घरी जायचे : छगन भुजबळ
– सर्व पक्ष, जाती-धर्मांना सोबत घेऊन गेलं पाहिजे : छगन भुजबळ
– 17 टक्के आरक्षण उरलंय आणि 400 जाती आहेत, कसं द्यायचं आरक्षण? : छगन भुजबळ

– मराठा समाजाने समजून घ्यावं, तो मोठा भाऊ आहे : छगन भुजबळ
– माझं पूर्ण समर्थन, मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा, कुणीही सांगावं मी विरोध केला : छगन भुजबळ
– इंदिराजींची आणीबाणी घटनेवर आधारीत होती, आताची आणीबाणी मात्र भीषण आहे : छगन भुजबळ
– आपण आत्मसंतुष्ट नाही, चार वर्षात त्यांनी खूप दिलं : छगन भुजबळ
– शेतकऱ्यावर कमी भावासाठी जबरदस्ती, शेतकरी रडताएत, पाकिस्तानची साखप आता यांना गोड लागते : छगन भुजबळ
– आता गावात आत्महत्या होत नाही, मंत्रालयासमोर होतात : छगन भुजबळ
– केवढे चांगले दिवस, शेतकरी आत्महत्या करत नाही, हमीभाव मिळतोय : छगन भुजबळ
– चार किमी गंगा दाखवा जी तुम्ही स्वच्छ केली, ते सांगतील सुद्धा, त्यांनी खूप काम केलं आहे : छगन भुजबळ
– देशात चार स्मार्ट सिटी दाखवा, चार जिल्हे दाखवा जे पूर्ण प्रकाशमान आहेत, ज्यांच्यातील जनधन खाती जीवंत आहेत : छगन भुजबळ

– इंदिराजींनी लावलेली आणीबाणी घटनेप्रमाणे होती. आताची आणीबाणी घटनेपलीकडील

– मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसी समाजाला घेऊन मी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल.

– आरक्षणाच्या मुद्यावरून मी शिवसेना सोडली. मी राष्ट्रवादी का सोडेन ?

– अच्छे दिन आले, सांगा कुठला शेतकरी खूश आहे

– आरक्षणाला अन्य पक्षांचा विरोध, पण शरद पवारांचेच आरक्षणाला समर्थन

– केंद्र व राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी

– १०० कोटीचा खर्च असताना ८५० कोटीचा घोटाळा झाला कसा

– महाराष्ट्र सदन सुंदर.. छगन भुजबळ अंदर

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.