rangpanchami यावर्षीचा नाशिकचा रंगपंचमी उत्सव बेरंग होणार वाचा पूर्ण बातमी

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने होळी सण साजरा करण्यास प्रतिबंध घातल्याने यावर्षीचा होळी उत्सव बेरंग होणार असून,शहरातील रंगपंचमीसाठी उघडण्यात येणाऱ्या रहाड बंदच  राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे नाशिककरांना आपल्या आनंदावर पाणी सोडावे लागणार आहे .rangpanchami

नाशिक रहाड
शहरातील रंगपंचमीसाठी उघडण्यात येणाऱ्या रहाड बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे


महाराष्ट्रात कोरोना विषाणूने पुन्हा आपले डोके वर काढल्याने कोरोना बाधित रुग्नांची संख्या हजारोंच्या घरात गेली आहे . काही दिवसांपासून नाशिक शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत असून दिवसाला टिकते चार हजार रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे . कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी रात्रीची संचारबंदी आणि शनिवार रविवार जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने वगळता बाजारपेठा बंद ठेवण्यात येत आहे .
रविवार दि २८ रोजी होळीचा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा करू नये असे आदेश शासनाने काढल्याने यावर्षी होळी पेटणार नाही . तसेच दि २ एप्रिल रोजी रंगपंचमी देखील साजरी होणार नसल्याने रंगोत्सवासाठी खोदण्यात येणाऱ्या रहाड बंदच राहणार असल्याने नाशिककरांच्या आनंदावर विरजण पडले आहे .rangpanchami

चौकट : पूर्वी नाशिक मध्ये पेशवेकालीन १६ रहाड असल्याचे जुने जाणकार सांगतात . मात्र ,आजच्या घडीला फक्त पंचवटीतील शनिचौक,दिल्ली दरवाजा,जुनी तांबट आळी,तिवंधा चौक,काजी पुऱ्यातील दंडे हनुमान मित्र मंडळाची रहाड सुरु आहे . पूर्वी काळाराम मंदिर पूर्व दरवाजा,सरदार चौक,रोकडोबा तालीम,तिवंधा चौक,कादर चौक फुले मार्केट,सुंदर नारायण मंदिर,वावरे गल्ली,मखमलाबाद,घनकर गल्ली अशा ठिकाणी रहाड होत्या. प्रत्येक राहाडीच्या पूजेचा मान वेगवेगळ्या घराण्यांकडे होता .मात्र नवीन रस्ते,काही ठिकाणी झालेल्या दुर्घटना आणि वाढत्या लोक संख्येबरोबर ऐतिहासिक रहाडी लुप्त होत गेल्या असल्याचे जाणकार सांगतात .

चौकट : राहाडीचे महत्व असे सांगितले जाते कि वसंत ऋतूच्या सुरवातीला येणारा सण म्हणजे रंगपंचमी असून या ऋतूत येणारे आजार जसे गोवर,कांजण्या व देवी या सारखे रोग लागू नये आणि हा वसंत ऋतू आनंदात जावा आणि लहान मुलांना उन्हाळा बाधू नये . यासाठी राहाडीतील रंगाने अंघोळ केल्यास या रोगांपासून आपली सुटका होते अशी आख्यायिका असल्याने या ठिकाणी नाशिक मधील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून ज्यांना याची माहिती आहे असे हजारोंच्या संखेने नागरिक येत असतात. या ठिकाणी रहाडमधील रंगाने अंघोळ करण्यासाठी अडीच वर्षांच्या बाळापासून ते सत्तर वर्षांच्या वयापर्यंतचे वयोवृद्ध लोक येवून रंग खेळतात . rangpanchami

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.