राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा ‘विना मास्क’ आलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक राज ठाकरे यांच्या समोर आले. यावेळी अशोक मुर्तडक यांनी तोंडावर मास्क घातले होते. राज ठाकरे यांनी त्यां मास्क पाहिले आणि अशोक मुर्तडक यांना थेट ‘मास्क काढ’ असे सांगितले. राज ठाकरे यांच्या या कृतीची चर्चा दिवसभर सुरु होती. राज ठाकरे लग्न सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आले होते.raj thackeray
राज ठाकरे तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये आल्यानंतर मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी सकाळी हॉटेल एक्सप्रेस इन राज ठाकरेंना भेटायला आलेल्या नेते, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विना मास्क उपस्थिती लावली. विनामास्क असणाऱ्या काही लोकांना हॉटेलच्या बाहेर काढलं. मात्र कोणतीही दंडात्मक कारवाई केली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.raj thackeray