मध्यवर्ती ठिकाणी वाहतूक समस्यांचे निराकरण
गंगापूर रस्ता आणि शरणपूर रस्ता यांना जोडणाऱ्या शहरातील पंडित कॉलनीतील रस्त्यांवर आता एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोड कडून टिळकवाडी सिग्नलकडे येतानाचा रस्ता आणि राका कॉलनी चौक येथून मॅरेथॉन चौक येथे येतानाचा रस्ता एकेरी वापरता येणार आहे. याबाबतचा अध्यादेश शहर वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी मंगळवारी (दि. १२) काढला आहे. no entry single lane traffic pandit colony nashik
टिळकवाडी सिग्नल पासून केटीएचएम कॉलेज कडे जाणारी वाहतूक आधीच एकेरी होती मात्र या रस्त्याचा वापर दुहेरी वाहतुकीसाठी होत होता. त्यामुळे केटीएचएम कॉलेज उड्डाणपुलाजवळ वाहतूक कोंडी होत होती. हा प्रश्न यामुळे निकाली निघण्यास मदत होणार आहे.
तसेच पंडित कॉलनी मध्ये झालेला कॉर्पोरेट ऑफिसेसचा गजबजा, हॉस्पिटल्स यामुळे वाढलेली वाहतूक आणि पार्किंगची समस्याही जटील झाली आहे. हा प्रश्न आता मार्गी निघणार आहे.
पंडित कॉलनीतील आतील रस्त्यांवर लहान वाहनांना प्रवेश असणार आहे.
वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत हलगर्जी करणाऱ्या नाशिककरांना वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालवण्याचे आवाहन nashikonweb.com ची टीम करत आहे.
आपल्या आसपा घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वेबसाईटला व्हिजीट करत राहा. आमचे फेसबुक पेग लाईक करा : https://www.facebook.com/NashikOnWeb/