मुख्यमंत्री दौऱ्यात नाशिकला कोणतही ठोस असे अनुदान मदत नाहीच

समृद्धी बाबत शेतकऱ्यांचं समाधान झाल्या शिवाय निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री

सावरकरांना भारतरत्नचा  प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला

नाशिक : समृद्धी महामार्गाला विरोध होतोय मात्र ८० टक्के ठिकाणी या महामार्गाला पाठींबा दिला असून. यावर होत असलेल्या विरोधाला चर्चा करणार असून, समृद्धी बाबत शेतकऱ्यांचं समाधान झाल्या शिवाय निर्णय घेणार नाही असे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

बहुतेक सर्व शेतकरी वर्गाला हा समृद्धी महामार्गाला हवा आहे. सर्वांची त्याला मंजुरी आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग होणार आहे. जो विरोध आहे तो चर्चेतून सोडवू असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मोजणी झाल्याशिवाय कसं कळणार शेतकऱ्यांचं किती नुकसान होतंय सगळे नेते एकाच गावात जातायत तिथली खरी परिस्थिती बघणं गरजेचं आहे असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

नाशिक महापालिकेत येणारे ते राज्यातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. मात्र या दौऱ्यात नाशिकला कोणतही ठोस असे अनुदान किंवा सरकारी मदत मात्र जाहीर झाली नाही.

शहरातील घनकचरा, सांडपाणी, पिण्याचं पाणी वाहतूक व्यवस्था, सुसह्य करण्यासाठी नियोजन, गोदावरी साठी विशेष योजना सुरु करण्यासाठी मी सूचना केल्या आहेत.त्यामुळे स्मार्ट शहर योजनेत योग्य असे काम नाशिकला करता येणार आहे. पहिल्या दहा स्वस्छ शहरांमध्ये नाशिकचा समावेश करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असे मुख्यमंत्री मत व्यक्त केले आहे.

मी हे शहर दत्तक घेतलंय हे माझ्या लक्षात आहे. त्यानुसार शहराचे नियोजन करणार आहे. तर मेक इन नाशिकला पाठबळ देणार आहे. मात्र महापालिका राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून पैसा उभारल्यानंतर जो तुटवडा पडेल तो पैसा राज्य सरकार देईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. सावरकराना भारत रत्न मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्रा कडे प्रस्ताव पाठवला आहे असेही माहिती त्यांनी दिली आहे.

एकूणच नाशिक महापालिकेला दिलेल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काही ठोस मिळाले नाही. कोणतेही अनुदान अथवा नवीन योजना नाशिकला मिळाली नाही. महापालिकेने जवळपास दोन हजार कोटी रुपयांची अपेक्षा केली होती.मात्र हाती निराशाच पडली आहे.जिल्हा बॅंकेसंदर्भात लवकरच बैठक घेवून निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकरी संप आणि एकलहरा

शेतकरी वर्गाची स्थिती आणि त्यांच्या मागण्या आम्ही जाणून घेणार आहोत. त्याच्या सोबत आम्ही चर्चा करणार आहोत. शेतकरी संपाबाबत त्यांची भूमिका जाणून चर्चा करणार आहोत असे मत फडणवीस यांनी मांडले आहे.

आपल्या राज्याकडे पुरेशी वीज आहे. त्यामुळे एकलहरेचा औष्णिक विद्युत वीज निर्मिती प्रकल्प इतरत्र हलवण्याचा संबंधच नाही.तो हलवता येणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.