पुन्हा एकदा विमान उडालच नाही, कंपनीला काळ्या यादीत टाका

कंपनीला काळ्या यादी टाका खासदार हेमंत गोडसे यांनी केली मागणी

नाशिक : नाशिकहून शुक्रवारपासून सुरु होणारी नाशिक – मुंबई-पुणे विमानसेवा पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. आता आठवडाभरासाठी ही सेवा पुढे ढकलण्यात आली आहे. नाशिकच्या ओझर एअरपोर्टवर सकाळी सहापासून मुंबईच्या दिशने विमान उड्डाण झालेच नाहीच. no airplane fly today nashik airport pune mumbai udan

याआधी नाशिकहून नियमित सेवा सुरु होईल असे एअर डेक्कन कंपनीने स्पष्ट केले होते. मात्र ऐनवेळी उड्डाण रद्द करण्यात आले. दुसरीकडे कंपनीच्या अनियमित सेवेकडे पाहता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी एअर डेक्कन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. no airplane fly today nashik airport pune mumbai udan

पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या उडान योजनेअंतर्गत नाशिक आणि कोल्हापूर शिवाय अन्य शहरांत विमानसेवेची घोषणा करण्यात आली होती. मात्र नाशिक- मुंबई, नाशिक-पुणे विमानसेवा कधी तांत्रिक कारण, कधी पायलटची कमतरता, तर कधी स्लॉटची मर्यादा अशा वेगवेगळय़ा कारणांमुळे रखडली होती.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरु झाल्यानंतर नाशिकची ही विमानसेवा सुरु करण्याच्या हालचाली एअर डेक्कन सुरु केल्या. त्यानुसार वेळापत्रक ही ठरले. एअर डेक्कनने त्यांच्या वेबसाईटवर २० एप्रिलपासूनचे बुकिंग सुरु केले होते.

नाशिकहून उड्डाण केलेले विमान ६ वाजून ५० मिनिटांनी मुंबईत पोहोचणार होते तर दुपारी ४ वाजून५५ मिनिटांनी मुंबईहून उड्डाण घेतलेले विमान पावणे सहा नाशिकमध्ये पोहोचणार होते. मग नाशिकहून पुण्याला ६ वाजून ५ मिनिटांनी विमान उड्डाण होते, तर पुण्याहून नाशिकच्या दिशेने ७ वाजून ५ मिनिटाने विमानाचे उड्डाण करुन रात्री पावणे आठला ते ओझर विमानतळावर पोहचणार होते. मात्र आता कंपनीने ऐन वेळी ही सेवा काही कालावधीसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला. no airplane fly today nashik airport pune mumbai udan

यासंपूर्ण घडामोडीवर एअर डेक्कनच्या अधिका-यांनी पुढील आठवड्यात नाशिक-मुंबई विमान सेवा सुरु होणार आहे अशी माहिती दिली आहे. विमान सेवा सुरळीत होण्यासाठी किमान आठवडा तरी लागणार आहे. मात्र विमानसेवा अचानक रद्द करण्याचे कारण सांगितलेले नाही.

no airplane fly today nashik airport pune mumbai udan

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.