महासभेत राडा, विरोधक महिला नगरसेवक आक्रमक,राजदंड पळवण्याचा प्रयत्न

ऐनवेळी विषय मंजूर : nmc mahasabha opposition female corporators angry try steal Rajdand 

नाशिक – ऐनवेळी महासभेत अतिरिक्त विषय टाकून मजूर करवून घेतल्याने सभागृहात विरोधक आक्रमक झाले होते. नाशिक महापालिकेच्या महासभेत एकाच प्रभागात वीस-वीस ग्रीन जिम मंजूर करून इतिवृत्तात घुसविण्यात आल्याचा आरोप करत महिला आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी केला. याबाबत जेव्हा महापौरांना प्रश्न विचारला आणि महापौर पीठासनासमोर जमून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी विरोधकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला आहे. आज मोठ्या प्रमाणत महासभेत गोधळ पहायला मिळाला आहे.nmc mahasabha opposition female corporators angry try steal Rajdand 

जेव्हां विरोधक प्रश्न विचारत होते त्याच वेळी भाजपाने प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. मात्र हे उत्तर न पटल्याने  गोंधळ अधिकच वाढला होता. याच गोंधळात त्यातच महापौरांनी नव्या महिला आणि बाल कल्याण समिती सदस्यांची नावे घोषित केली, तेव्हा संताप व्यक्त करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी पीठासणावर जाऊन राजदंड खेचण्यास सुरुवात केली होती. या गोंधळात नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सहभागी झाले होते. या गोंधळात महापौर रंजना भानसी यांनी राष्ट्रगीत सुरू करून कामकाज संपवले. महिला व बालकल्याण समितीचा निधी हा महिलांच्या विकास निधीसाठी खर्च न करता प्रभाग क्र. २० मधील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संभाजी मोरस्कार यांनी तो निधी परस्पर वळवला. स्वतः च्या प्रभागात २० ग्रीन जीम करता सुमारे ८० लाख रुपयांचा निधी खर्च करत असल्याचा आरोपही सेनेने केला आहे. गेल्या महासभेतील इतिवृत्तामध्ये विरोधी सदस्यांच्या सूचनांची नोंद न घेता केवळ भाजपच्याच सदस्यांची कामे या इतिवृत्तात आल्याने हा गोंधळ झाला.

महिला बालकल्याण समिती सदस्य नयना गांगुर्डे यांनी या विषयावर मत मांडल्यानंतर खरे तर या गोंधळाला सुरवात झाली. यावेळी विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी झालेल्या गोंधळात महापौरांच्या माईकची वायरही तोडण्यात आली.

आजच्या महासभेत शहरात घरपट्टी वाढीला मंजुरी देण्याचा विषय इतिवृत्तात होता तो टाळण्यासाठी पूर्व नियोजित गोंधळ घालण्यात आल्याची चर्चा समोर आली आहे.

आपला Whats App ग्रुप आहे आमचा 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेवा करा नाशिकच्या बातम्या मिळावा !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.