मनपा अभियंता आत्महत्या धमकी देत बेपत्ता

नाशिक : नाशिक नाशिक महानगरपालिकेतील पश्चिम विभागाच्या नगररचना विभातील एका अभियंत्याच्या आत्महत्येचा कारमध्ये इशारा देणारी चिट्ठी मिळाली असल्याने सर्व ठिकाणी अभियंत्याची शोध सुरु झाला आहे. मनपातील कामाच्या दबावामुळे असे झाले असावे असा अदाज वर्तवला आहे. तर ग्रीनफिल्ड लॉन्स चौकशी प्रकरणी मनपाच्या नगररचना विभागाचे उपअभियंता रवी पाटील यांच्या सह चौकशी सुरु असून, यामध्ये उच्च न्यायलयाने आयुक्त मुंढे यांना स्थगिती असतांना कारवाई का केली असे बोलत झापले होते.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार महापालिका कार्यालयात काम करताना येत असलेल्या दबावामुळे आत्महत्येचा इशारा दिला असावा असे म्हटले आहे.आज ते घराबाहेर गेले मात्र त्यांचा फोन आणि गाडी घराखाली उभी असल्याने कारमध्ये चिट्ठी मिळाल्यापासून अभियंत्याशी संपर्क झाली नाही. कुटुंबियांनी ही चिठ्ठी पोलीस ठाण्यात आणून दिली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांसह नातेवाईकांनी अभियंत्याचा शोध घेणे सुरु केले आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या दोन दिवसांपासून शहरात 49 अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. कामात बेपर्वाई केली म्हणून अनेकांच्या चौकश्या सुरु केल्या आहे. तर कर्मचारी वर्गाला कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.