आयुक्त मुंढे घनकचरा प्रक्रिया केंद्र पाहणी दौरा, केल्या अनेक सूचना

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घनकचरा व्यवस्थापनासंबंधी प्रक्रिया केंद्र व वेस्ट टु एनर्जी प्रकल्प तसेच पाथर्डी येथील जलशुध्दीकरण केंद्र येथे सकाळी पहाणी केली. nmc commissioner tukaram mundhe visits Solid Waste Processing Center suggesions

आयुक्तांनी घनकचरा प्रक्रिया केंद्र तथा सायंटिफिक लॅन्डफिल साईट येथे सकाळी भेट देवून पहाणी केली. सदर पहाणी दरम्यान त्यांनी स्वयंचलीत वजन काटा, प्रिसॉर्टींग विभाग, विड्रोज कंपोस्ट्रीग विभाग, प्लास्टीक टु फयुएल प्लँट, लिचेट ट्रिटमेंट प्लँट, मृत जनावरे शवदाहिनी, आर.डी.एफ. विभाग कंपोस्ट फिनिशिंग विभाग, लॅन्डफिल कॅपिंग इत्यादींची पहाणी करुन विविध सुचना दिल्या.

पहाणीदरम्यान त्यांनी अंतर्गत रस्त्यांची आवश्यक किरकोळ डागडुजी करणे व पावसाळी पाण्याचा व्यवस्थीत निचरा होण्याच्या दृष्टीने उपाययोजना पावसाळा सुरु होण्यापुर्वी पूर्ण करणेबाबत आदेशित केले.

आयुक्तांनी दोन महिन्यापुर्वी बैठक घेवून घनकचरा वर्गीकरण प्रक्रिया, प्लॅास्टीक कच-यावर प्रक्रिया, जुन्या लॅन्डफिल कॅपिंग करणे इत्यादी बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पहाणी दरम्यान वरील बाबींचा आढावा घेण्यात आला. पहाणी दरम्यान सुमारे 70टक्के पर्यंत वर्गीकरण होत असल्याचे दिसुन आले. त्याबाबत आयुक्तांनी वर्गीकरण 100 टक्केपर्यंत करण्याच्या सुचना दिल्या. तसेच वर्गीकरणाची गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे. यासाठी नागरीकांना ओला कचरा देतांना प्लास्टीक पिशवीमध्ये न देता बीनमध्ये ठेवून तो घंटागाडीमध्ये देण्याचेही आवाहन मा. आयुक्तांनी केले.

ज्या भागातील घंटागाडयांमध्ये वर्गीकरणाचे प्रमाण कमी दिसुन येत असेल त्याबाबत नोंद घेऊन सदर भागात वर्गीकरणावर लक्ष केंद्रित करणेबाबत सुचना दिल्या.

पहाणी दरम्यान गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत वर्गीकृत कच-याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्यामुळे प्रक्रियेत सुलभता आली असुन तयार होणा-या खताच्या तसेच आर.डी.एफ.च्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसुन आले आहे. प्लास्टीक कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी चार मेट्रीक टन प्रतीदिन क्षमतेचा प्लास्टीक टु फयुएल प्लॅट उभारुन कार्यान्वीत केला असुन त्यापासुन तयार होणारे ऑइलची गुणवत्ता डिझेलच्या जवळपास आहे.

सदर ऑईलचा वापर मृत जनावरे शवदाहिनीकरीता करणेत येते. कच-यापासुन तयार होणा-या लिचेटवर प्रक्रिया करुन त्यापासुन तयार होणा-या मिथेन गॅस वापरून इंजिनव्दारे वीज निर्मीती करुन तीचा वापर लिचेट प्लँट चालविणेसाठी करण्यात येतो.

तसेच उद्यानातील कचरा व पालापाचोळा यासाठी स्वतंत्र 19 वाहनांची व्यवस्था केली असुन सदर कच-यावर प्रक्रिया करणेसाठी मा. आयुक्तांनी यापुर्वी दिलेल्या सुचनेनुसार स्वतंत्रपणे नविन श्रेडींग मशिन (वूड चिपर) लावण्यात आले आहे. त्यात उद्यानातील कचरा, झाडांच्या फांदया यांची प्रक्रिया करुन त्याचा इंधन म्हणून वापर करण्यात येत आहे. दैनंदिन येणा-या कच-यावर प्रक्रिया करुन दररोज सुमारे 50 ते 60 टन खत व सुमारे 50 टनापर्यंत आर.डी.एफ. तयार करण्यात येते.

मा. आयुक्तांनी सदर ठिकाणी सुरु असलेल्या लॅन्डफिल कॅपिंगच्या कामाची पहाणी करुन पहिल्या टप्प्यातील काम मे 2018 अखेर पावेतो पूर्ण करुन त्यावर गार्डन व लॅन्ड स्केपिंग करणे बाबत सुचना दिल्या. तसेच प्रक्रियेची कार्यक्षमता व गुणवत्ता वाढविणेसाठी प्रक्रिया केंद्रामध्ये स्काडा सिस्टीम व ॲटोमेशनचा वापर करणेबाबत सुचना दिल्या. प्रिसॉटींग विभागात ताज्या कच-याच्या येणा-या वासाचे प्रमाण कमी करण्यासाठी टॉप स्पिंकलर सिस्टीम 15 दिवसांत लावणेबाबत सुचना दिल्या. तसेच प्रकल्पातील प्रत्येक विभागात माहिती मिळणेसाठी माहिती फलक लावणेबाबत सुचना दिल्या. nmc commissioner tukaram mundhe visits Solid Waste Processing Center suggesions

तसेच आयुक्तांनी जी.आय.झेड जर्मनी यांचे सहकार्याने उभारण्यात आलेल्या वेस्ट टु एनर्जी प्रकल्पास भेट देवून पहाणी केली. सदर प्रकल्पात हॉटेलमधील ओला कचरा व सार्वजनीक शौचालयातील मलजल यावर प्रक्रिया करुन वीज निर्मीती करणेत येते. त्याबाबत आयुक्तांनी सर्व हॉटेल चालकांना ओला व सुका कचरा वर्गीकरण करणेबाबत तसेच वर्गीकरण न करणा-या हॉटेल चालकांवर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व वेस्ट टु एनर्जी प्रकल्प प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवारी शाळा, कॉलेज तसेच नागरीकांना पहाण्यासाठी खुला ठेवणेबाबत तसेच नागरीकांना सविस्तर माहिती देणे बाबत मा. आयुक्तांनी अधिकारी व प्रकल्प संचालकांना आदेशीत केले. nmc commissioner tukaram mundhe visits Solid Waste Processing Center suggesions

त्यानंतर मुकणे पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाथर्डी येथील 137 द.ल.लि./दिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्राचे काम सुरु असुन मा. आयुक्तांनी भेट देवून पाहणी केली. 24X7 पाणी पुरवठा करण्याचे दृष्टीने संपूर्ण केंद्र स्काडा सिस्टीम व ॲटोमेशन व्दारे संचलित करणेबाबत सुचना दिल्या. जलशुध्दीकरण केंद्रातील एरिएशन फाउंटन ते प्युअर वॉटर संपपर्यंत प्रत्येक उपांगांची पहाणी करुन कामाची गती वाढवून काम मुदतीत पूर्ण करणे बाबत सुचना दिल्या.

nmc commissioner tukaram mundhe visits Solid Waste Processing Center suggesions
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.