आयुक्त मुंढेंविरोधात लवकरच अविश्वास ठराव; नाशिककरांचे लक्ष

नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाचा कारभार हाती घेतल्यापासून एकाधिकारशाहीने वागून नगरसेवकांची बदनामी करत असल्याचा ठपका ठेवत अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. करवाढ रद्द करण्याच्या महासभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत मुंढेंच्या आदेशानुसार मनपा प्रशासनाने वाढीव दराने घरपट्टीची देयके वितरीत करण्यास सुरुवात केल्याने नगरसेवकांचा संताप अनावर झाला आहे. nmc commissioner tukaram mundhe mistrust resolution mahasabha nashik people support

त्याच अनुषंगाने शुक्रवारी (दि. २४) रोजी रात्री उशिरा तातडीने बोलाविण्यात आलेल्या स्थायी सदस्य आणि सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत अविश्वास ठरावासाठी विशेष महासभा बोलविण्याकरीता स्वाक्षरी पत्र तातडीने लिहून घेण्यात आले आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर नाशकातही मुंढे यांच्याविरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३६/३ अन्वये अविश्वास आणण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

त्याप्रमाणे स्थायी समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र नगरसचिवांना सादर करण्यात येऊन या आठवड्यात विशेष महासभा घेऊन हा अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. या अविश्वास ठरावासाठी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची संमती असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मुंढे यांची कार्यपद्धती नगरसेवकांसह पालकमंत्र्यांना देखील रुचलेली दिसत नाही. nmc commissioner tukaram mundhe mistrust resolution mahasabha nashik people support

विशेष महासभेत काय होऊ शकते??

नाशिक मंडपामध्ये एकूण १२७ नगरसेवक आहेत. त्याप्रमाणे आयुक्तांविरोधात अविश्वास आणण्यासाठी महासभेच्या दिवशी सभागृहात ८४ नगरसेवकांची संमती असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पक्षांकडून नगरसेवकांना विशेष महासभेला उपस्थित राहण्यासाठी गटनेत्यांच्या माध्यमातून व्हीप बजावला जाईल. सोमवारी सचिवांना पात्र दिल्यानंतर लगेचच विशेष महासभा घेण्यासंदर्भात गटनेत्यांची बैठक बोलविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला असून सूत्रांच्या माहितीनुसार त्यानंतर लगेचच महापौर विहेष महासभेची तारीख जाहीर करतील.

शुक्रवारी झालेल्या बैठकीचा तपशील :

शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक. सभागृहनेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (फोनवर), मनसे गटनेते सलीम शेख, कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे आदी या बैठकीसाठी उपस्थित. आ. देवयानी फरांदे उशिराने बैठकीत सामील. अविश्वास ठरावाकरिता विशेष महासभेचे आयोजन आवश्यक असल्याने कायद्यातील तरतुदींनुसार स्थायी समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापौरांच्या नावे तत्काळ लिहून घेण्यात आले. यासाठी स्थायी समिती सदस्य उद्धव निमसे, दिनकर पाटील, प्रवीण तिदमे, सुषमा पगार, पुष्पा आव्हाड, संतोष साळवे, संगीता जाधव यांच्या पत्रावर साह्य घेण्यात आल्या. स्थायी सभापती हिमगौरी आहेर-आडके बैठकीला उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या व्यतिरिक्त सर्व १४ सदस्यांच्या पत्रावर सह्या. nmc commissioner tukaram mundhe mistrust resolution mahasabha nashik people support

काय आहेत नगरसेवकांचे मुंढेंवरील आक्षेप?

मनमानी आणि हुकूमशाही पद्धतीने कामकाजाची पद्धत, नागरसेवकांबाबत नाशिककरांमध्ये अविश्वास आणि असंतोष पसरविण्याचे काम करणे, महासभेच्या अधिकारांवर गदा आणणे, घरपट्टी दरवाढीबाबत महासभा आणि नगरसेवकांचे न ऐकणे, धोरणात्मक निणरायांची परस्पर अंमलबजावणी करणे.

काय असू शकतात मुंढेंबाबत नगरसेवकांची असंतोषाची खरी करणे!

सत्तारूढ भाजपची २५७ कोटींच्या रस्ते विकासाचा ड्रिम प्रोजेक्ट रोखण्याची मुंढे यांची आगळीक, त्रिसूत्रीचे कारण देत नगरसेवक निधीतील मंजूर कामांना ब्रेक लावण्याचा निर्णय, अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधातील मुंढेंची भूमिकेमुळे नागरसेवकांच्या भूमिकेला खतपाणी, नवीन मिळकतींच्या करयोग्य मूल्य दरात पाच ते सहापट वाढ करताना शेतीक्षेत्रावरही अवाजवी घरपट्टी लागू करण्याचा घेतलेला निर्णय, या निर्णयावर नागरिक जाब विचारात असताना नागरसेवकांकडे उत्तर नाही, पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करून करवाढ मुक्तीदेण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देऊनही तसेच या करवाढ रद्द करण्याचा निर्णय महासभेच्या ठरवलं केराची टोपली दाखवली, वाढीव दराने घरपट्टीची देयक नागरिकांना पाठविण्यास सुरुवात. nmc commissioner tukaram mundhe mistrust resolution mahasabha nashik people support

काय आहे राजकीय पक्षांची भूमिका?

अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्यावरून अनेक पक्षात गटतट दिसून येत आहेत. शिवसेनेमध्ये या प्रकरणात सरळ दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचे तळ्यात मळ्यात असून माजी खासदार यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत या प्रकरणात भाजप जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. गटनेते गजानन शेलार यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. मनसेमध्येही संदिग्धता दिसून येत आहे. सलीम शेख मात्र शुक्रवारच्या बैठकीला हजर होते.

अन्याय निवारण समितीचा पाठिंबा!

घरपट्टी दरवाढ प्रकरणात विरोधाची भूमिका घेत विभागनिहाय मेळावे घेणाऱ्या अन्याय निवारण समितीने आयुक्तांवरच्या अविश्वास ठरवलं पाठिंबा दिला असून ही कृती उशिरा होत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवकांनी खूप आधी अशी भूमिका घ्यायला हवी होती असे समितीचे मत पडले आहे. त्यात नाशिककरांची भूमिका काय असते यावर संपूर्ण प्रकरणाचे वळण ठरणार असून सध्यातरी नाशिककर मुंढे यांच्यासोबत असल्याचे NashikOnWeb च्या फेसबुक पेजवर मिळणाऱ्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे.

nmc commissioner tukaram mundhe mistrust resolution mahasabha nashik people support
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.