नाशिक : शहरातील करवाढीच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आहे. त्यामुळे शहरात सध्या मुंढे, नागरिक, आप पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा, शिवसेना , महापौर , विद्यमान आमदार असा जोरदार वाद सुरु आहे. मात्र ज्यामुळे वाद निर्माण झाला असे चित्र होते ती करवाढ आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही ठिकाणी कमी तर पूर्ण रद्द केली आहे. त्यामुळे आता सत्तधारी भाजप कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. NMC commissioner Tukaram mundhe cut off tax rates cm advise news
मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णत: रद्द केली आहे. तर नवीन वार्षिक भाडे मुल्य आकारताना जी दुप्पट तिप्पट वाढ केली होती ती सरासरी पन्नास टक्कयांनी मागे घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दैलासा मिळणार आहे.NMC commissioner Tukaram mundhe cut off tax rates cm advise news
मनपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी आपल्या ३१ मार्च रोजीच्या अधिसूचनेत शुध्दीपत्रक काढण्यात आल्याचे सांगितले आहे. तुकाराम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर ही दरवाढ कमी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. सोबतच हा निर्णय महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच दरवाढ मागे घेतली असे त्यांनी नमुद केले आहे.NMC commissioner Tukaram mundhe cut off tax rates cm advise news
तुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च विशेष अधिसूचना काढून मिळकतींच्या वार्षिक भाडेमुल्यात वाढ केली होती. यामध्ये मोकळ्या भूखंडाच्या कर आकारणीचे दर ३ पैशांवरून ४० पैसे असे केले होते, त्यामुळे शेती बिनशेती आणि क्रीडांगणे मैदान यावर एकरी एक लाख रूपयांपेक्षा अधिक घरपट्टी आकारणी होणार होती. तर याशिवाय निवासी क्षेत्रात यापूर्वी मालकाला एक पट तर भाडेकरुला दुप्पट कर आकारणी होती, ती तिप्पट केली होती. मात्र आयुक्तांनी घेतलेल्या नवीन निर्णयानुसार ती सर्व मागे घेतली आहे.NMC commissioner Tukaram mundhe cut off tax rates cm advise news
तर नव्या शैक्षणिक इमारतींना वाणिज्य दराने घरपट्टी लागु करण्यात आली होती ती देखील त्यांनी बदलून शाळा इमारतींना घरगुती दर लागु होतील असे जाहिर केले आहे. त्यामुळे भाजपा नगरसेवक जे कारणे सांगून विरोध करत होते त्यातील हावाच निघून गेली आहे.मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून येत्या शनिवारी (दि. १सप्टेंबर) विशेष महासभा घेण्यात येणार आहे.
आयुक्तांनी प्रसिद्ध केले नवीन सुधारित दर खालील प्रमाणे :order no 139 dt. 27.08.2018