११ डिसेंबर पासून नाशकात रंगणार कबड्डी प्रीमियर लीगचा थरार

११ ते १७ डिसेंबर दरम्यान लीगच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन

NKPL 2017 Nashik Kabaddi Premier League Season 2

नाशिक : नाशिक महानगरपालिका आणि क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने व्ही. एन. नाईक नाशिक कबड्डी प्रीमियर लीग सिझन-२ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांची मान्यता असणार आहे.

येत्या ११ ते १७ डिसेंबर दरम्यान या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे सामने लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहेत. पहिल्या पर्वात अनुभवलेला कबड्डीचा थरार नाशिककरांना पुन्हा अनुभवता येणार असल्याची माहिती माहिती व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी सोमवारी (दि. ४) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

NKPL 2017 Nashik Kabaddi Premier League season 2 vnnaik gopinath munde college नाशिक कबड्डी प्रीमियर लीग

डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या नाशिक कबड्डी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात नाशिक विभागातील ५ जिल्ह्यातील काबड्डीपटूचा समावेश होता. मात्र यावर्षी स्पर्धेचा आवाका वाढवत यंदा राज्य स्तरावर स्पर्धेत एकूण २० जिल्ह्यातील उत्तमोत्तम खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

यजमान नाशिक जिल्ह्यासोबत धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यातील ७८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

असे असतील संघ :

सर्वज्ञ रायडर्स, एबीसी रॉयल फायटर्स, नाशिक लायन्स, सिन्नर सायलेंट किलर, कन्हैया चॅलेंजर, दिंडोरी डिफेेेंडर्स

एकूण ४ हजार प्रेक्षक क्षमतेचे मैदान उभारण्यात येणार आहे. मैदान उभारणीचे काम आज मंगळवारी (दि. ५) करण्यात भूमिपूजन करून करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत प्रो कबड्डी स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी यातून नाशिककरांना मिळणार आहे.

या राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश

दादाजी आव्हाड, आदिनाथ, गवळी, मयूर शिवतरकर (प्रो कबड्डी) यांसह सिद्धार्थ देसाई, मोबीन शेख, प्रशांत जाधव, विवेक नाडार यासारखे राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.

अशी होईल स्पर्धा :

११ ते १७ डिसेंबर दरम्यान सायंकाळी ६ ते १० वाजे दरम्यान रंगणार सामने

१५ साखळी सामने व ४ बाद फेरीचे असे १९ सामने

हे सामने लाईव्ह बघण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा. https://www.facebook.com/NashikOnWeb/

एकूण १५.५० लाखाची बक्षिसे :

विजेत्या संघास ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि चषक,

उपविजेत्या संघास ३ लाख रुपये आणि चषक

तृतीय क्रमांकाच्या संघास २ लाख रुपये आणि चषक

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूस ३१ हजार रुपये

सर्वोत्तम चढाईपटू, पकडपटू २१ हजार रुपये

पत्रकार परिषदेस प्रभाकर धात्रक, तानाजी जायभावे, महेंद्र आव्हाड, प्रकाश घुगे, शरद बोडके, महेश आव्हाड, माणिक सोनवणे, विश्वनाथ शेळके, अजित बने, भूषण घुगे, विशाल संगमनेरे, किरण फड, राजेश दरगोडे उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.