नाशिक शहरात सोमवार पासून (दि. २२) मध्यरात्रीपासून म्हणजेच रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर १ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. Corona Curfew Nashik City
आज (दि. 21) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिककर संचारबंदीचे तसेच कोरोना नियमांचे किती पालन करतात यावर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. नाशिकमध्येही गेल्या 44 दिवसांनंतर 300 हुन अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाला वेळीच प्रतिबंध घातला नाही तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार येईल, असा इशाराही भुजबळ यांनी दोन दिवसापूर्वीच दिला होता.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी नाशिक महापालिका व पोलिस यांची संयुक्त कारवाई पथके राहणार आहेत. मास्क नसलेल्यांकडून थेट १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे निर्देशही भुजबळ यांनी या बैठकीत दिले आहेत. Corona Curfew Nashik City
● लग्नकार्यात जाऊन कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश
● शाळांबाबत पुढील 8 दिवसात परिस्थितीचा अंदाज घेऊन कारवाई करणार
आजचा कोरोना रिपोर्ट (दि. 21)
दिनांक: 21 फेब्रुवारी 2021
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-135
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 352
नाशिक मनपा- 254
नाशिक ग्रामीण- 75
मालेगाव मनपा- 16
जिल्हा बाह्य- 07
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2088
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -03
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00