पंचवटी एक्स्प्रेस झाली आदर्श पंचवटी, धावली नव्या रुपात (Special Photo Feature)

नाशिक : मुंबई येथे जाण्यासाठी सर्वांची आवडती पंचवटी एक्स्प्रेस आता आदर्श पंचवटी एक्स्प्रेस झाली आहे. आज औपचारिक घोषणा करत आदर्श पंचवटी धावली आहे.नव्या कोऱ्या २१ डब्यांसह अंतर्गत रचना बदलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवार दि. ९ पासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली. new look seats railway bogie aadarsh panchvati express

प्रामुख्याने गाडीतील स्वच्छता, सामाजिक सलोखा, लक्झरीअस आसनव्यवस्था आणि पाचवेळा लिम्का बुक मध्ये नोंद झालेल्या पासधारक बोगीचा लौकीक कायम राखत सकाळी ७.२० वाजता पंचवटी एक्सप्रेस आदर्श एक्सप्रेस नाशिकरोडहून मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे. new look seats railway bogie aadarsh panchvati express

नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या  चाकरमान्यांसाठी पंचवटी एक्सप्रेस ही महत्वाची गाडी मानली जाते. १ नोव्हेंबर १९७५ पासून पंचवटी एक्सप्रेस न थांबता रोज सेवा देते आहे. जवळपास ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सपे्रसचे रंगरूप बदलेले आहे.

पंचवटी एक्सप्रेसला रेल परिषदेच्या प्रयत्नामुळे ‘आदर्श कोच’ निर्माण करण्यात आला होता.या कोचला सलग पाच वेळा लिम्का बुक आॅफ रॅकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. हीच थीम ठेवत रेल्वेने बोगीच्या धर्तीवर संपुर्ण पंचवटी एक्सप्रेस आदर्श बनविण्यासाठी रेल परिषदेच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आणि पंचवटी एक्सप्रेसला सर्वच्या सर्व २१ नवे डबे जोडण्यात आले आहेत. new look seats railway bogie aadarsh panchvati express

संपुर्ण नवीन डबे आणि आरामदायी कुशनयुक्त आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व डब्यांना बायोटोयलेट जोडण्यात आले आहे.दोन डब्यांना जोडणाºयांना कपलिंगला इंटरलिंक दरवाजे करण्यात आले आहे तर स्लाईडींग विंडो करण्यात आल्या आहेत.

रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी, गुरमित रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी यांनी ‘आदर्श पंचवटी एक्सप्रेस’साठी रेल्वेला सुचविलेल्या विविध कामांचा पाठपुरावा केला होता. नाशिकरोड स्थानकावर सकाळी आदर्श पंचवटी एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार बबनराव घोलप, सुनील आडके, गुरमित रावल, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजू फोकणे आदिंसह पासधारक प्रवासी, रेल परिषदेचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. रेल परिषदेचे बिपीन गांधी यांचे आज अचानक निधन झाल्याने पंचवटीचे औपचारिक स्वागत करण्यात आले आहे. new look seats railway bogie aadarsh panchvati express

रेल परिषदेचे बिपीन गांधी यांचे निधन; नाशिकरोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर हृदयविकाराचा झटका

new look seats railway bogie aadarsh panchvati express

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

new look seats railway bogie aadarsh panchvati express
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “पंचवटी एक्स्प्रेस झाली आदर्श पंचवटी, धावली नव्या रुपात (Special Photo Feature)

  1. एक चांगली सुरवात, बघु आता किती दिवस आपले लोक हे टिकवून ठेवतात. ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.