New guidelines केंद्राच्या कोरोनावर नव्या गाइडलाइन्स:राज्यांना मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबरपासून होणार लागू

केंद्र सरकारने बुधवारी कोरोनाबाबत एक नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. राज्यांनी खबरदारी घेतली पाहिजे असे केंद्राने म्हटले आहे. तसेच राज्यांना देखरेख, कंटेंटमेंट आणि खबरदारीच्या बाबतीत काटेकोर पालन करावे लागेल. राज्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार निर्बंध लादण्यास सूट देण्यात आली आहे. केंद्राची ही मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.New guidelines

केंद्राने म्हटले आहे की कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपण आतापर्यंत मिळवलेले यश कायम राखायचे आहे. हे देशातील कमीतकमी सक्रिय प्रकरणांमधून स्पष्ट होते. मात्र, सणासुदीच्या हंगामात आणि काही राज्यांत प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली आहे. यासाठी राज्यांना सावधगिरी बाळगावी लागेल आणि कंटेंटमेंट, तसेच उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल.

सर्व्हिलान्स आणि कंटेंटमेंटसाठी गाइडलाइन्स

  • कंटेनमेंट झोनमधील राज्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. सर्विलान्स सिस्टम मजबूत करावी लागेल.
  • जिल्हा प्रशासनाला केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.
  • राज्यांना सूट देण्यात आली आहे की, त्यांनी आपली परिस्थिती पाहता स्वतः निर्बंध लावावे.
  • सर्व जिल्ह्यात तयार होणाऱ्या कंटेनमेंट झोनची यादी आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागेल. हे आरोग्य मंत्रालयालाही सांगावे लागेल.
  • या झोनमध्ये लोकांचे येणेजाणे काटेकोरपणे थांबवावे लागतील. केवळ अत्यावश्यक वस्तू आणि मेडिकलसाठी सूट देण्यात येईल.
  • कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी पाळत ठेवणारी पथक घरोघरी जातील. प्रोटोकॉलच्या हिशोबाने टेस्टिंग केली जावी.
  • संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येत असलेल्या लोकांची यादी असावी. त्यांना ओळख काढून त्यांना ट्रॅक करावे आणि अलग ठेवणे आवश्यक आहे.
  • संक्रमित व्यक्तीवर त्वरित उपचार सुरु केले पाहिजेत. त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात यावे. आवश्यक असल्यास, रुग्णालयात दाखल करण्यात यावे.
  • ILI आणि SARI प्रकरणांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि मोबाइल युनिट त्यांच्या संपर्कात असावेत.
  • स्थानिक जिल्हा प्रशासन आणि पोलिस हे निर्बंधाची अंमलबजावणी आणि नियमांचे पालन करण्याची जबाबदारी घेतील.

अनलॉक-5 च्या गाइडलाइंस दोन महिन्यापूर्वी जारी झाल्या होत्या
केंद्र सरकारने दोन महिन्यापूर्वी कोरोना काळात अनलॉक-5 च्या गाइडलाइंस जारी केल्या होत्या. यानुसार सणांचा सीजन पाहता सरकारने अनलॉक-5 मधील निर्बंध कमी केले होते. New guidelines

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.