राष्ट्रवादीकडून सरकार विरोधी निदर्शने व जिल्हाधिकारी गेट बंद आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला सत्तारूढ होऊन  ३ वर्षे पुर्ण झाली आहेत. सत्तारूढ होण्यापूर्वी भाजप-शिवसेना युती सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’सह अनेक आश्वासने व स्वप्ने दाखविली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतांनाही निवडणुकीपूर्वी दिलेल्या कोणत्याच आश्वासनांची पूर्तता मोदी सरकारने ३ वर्षाच्या कार्यकाळात केलेली नाही. याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठया प्रमाणात भाजीपाला आणून निदर्शने व गेट बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना वरील मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
नाशिक जिल्ह्यात सातत्याने झालेला अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ व दुष्काळ यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. एकटया नाशिक जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यात सुमारे १२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा सरकारने  शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी जाहीर करून नव्याने पतपुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली.  नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, डाळिंब आदी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करावा. शेतकऱ्यांच्या शेतपंपाची वीज बिले माफ करावीत. तसेच ग्रामीण भागातील विजेचे लोडशेडींग तातडीने रद्द करावे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून असलेले शेतकरी, शेतमजूर, इतर नोकरदार वर्ग यांच्या खात्यात असलेली रक्कम तातडीने त्यांना देण्यात यावी. अशा आशयाचे निवेदनही यावेळी देण्यात आले.
—————————————————————————————————————————————-
नाशिक मधील घडत असलेल्या घटना,महिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र,राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,आपल्या आजूबाजूला घडणारी घटना,सत्कार,सभारंभ,सांस्कृतिक कार्यक्रम,खेळ,कृषी,व्यक्ति विशेष,संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य,समाज सेवक कार्य,आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन,शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा  तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.