कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

जगभरामध्ये कोरोना विषाणुसारख्या रोगाने थैमान घाटल्याने लाखोंच्या वरती लोक मृत्युमुखी झालेले आहेत. अमेरिका,इटली,चीन हे विकसित देशही या विषानुस रोखु शकले नाहीत त्यावर उपाययोजना  म्हणुन मा पंतप्रधान यांनी देशभर 3 मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.      आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार च्या वरती जावून पोहचली असताना,राज्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी  ठोस उपाययोजना शासनाने आमलात  आणल्या आहेत.cancels all university exams

या संकतामुळे महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या परिक्षा लांबणीवर पडल्या आहेत.देशातील सद्यस्थिति बघता 3 में नंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नकारता येत नाही किंवा ३ मे नंतर लॉकडाऊन शिथिल  केल्यास जनजीवन पूर्वपदावरती येण्यास काही कालावधी लागणार आहे.महाराष्ट्रातील सद्यस्थितिमध्ये ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी शहरी भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते.त्यामुळे ३ में २०२० नंतर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या परिक्षा एकाच वेळी जाहीर केल्यास अडचन निर्माण होऊ शकते.cancels all university exams

ग्रामीण भागातील विद्यार्थी  महाविद्यालयीन शिक्षणाकरिता शहरांकडे जात असतात, त्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबुन असतात.तरीही ३ मे नंतर परिक्षा घेतल्या गेल्या तर सर्व अभ्यासक्रमाच्या  प्रात्यक्षिक परिक्षा महाविद्यालयीन स्थरावरती घेण्यास काही कालावधी द्यावा लागेल,तसेच उत्तरपत्रिका तपासणी व निकाल जाहीर करण्यास ऑगस्ट महिना लागु शकतो,हे वास्तव पुढील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना तसेच प्रशासनासमोर अडचण निर्माण करणार आहे.

 या सर्व  गोष्टींचा विचार करुण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी  विद्यापीठांच्या सर्व परिक्षा रद्द करण्यात याव्यात.तसेच प्रथम व द्वितीय वर्षमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुण पुढील वर्षामध्ये प्रवेश द्यावा,व शेवटच्या वर्षामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील सत्रातील गुणांच्या सरासरीने उत्तीर्ण करावे,ही विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ने केली आहे. याबाबत शहर उपाध्यक्ष तुषार जाधव यांनी माहिती दिली आहे.    

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.