नाशिककर हादरले, एका रात्रीत शहरात तीन खून

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तीन खुनाच्या घटना घटना घडल्या आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पहिली घटना ही सिडको परिसरात घडली आहे. डीजीपी नगरमध्ये साहेबराव जाधव नावाच्या रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. साहेबराव याला चार ते पाच जणांच्या टोळक्याने डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात साहेबराव जाधवचा मृत्यू झाला तर हल्लेखोर पसार झाले आहेत. संशयितांची नावे मयत जाधव याच्या भावाने पोलिसांकडे स्पष्ट करत संशयित हे साहेबरावला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत होते, अशी माहितीही दिल्याचे समजते. एकूणच पाच ते सहा हल्लेखोर या घटनेत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यामध्ये पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे.

दुसरी घटना राजीवनगर परिसरात घडली आहे. आपआपसातील वादातून झालेल्या मारहाणीत दोघांचा  मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. देवा इगे (राजीवनगर) आणि दिनेश नीळकंट बिराजदार (गणेश चौक) या दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र वादाचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.