ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन : नाशिकची आरती पाटील प्रथम

ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज ३० व्या ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 10 किमी महिला गटात नाशिकच्या आरती पाटीलने बाजी मारली असून ती प्रथम आली आहे. महिला गटात आरती पाटील हिने 1 तास 27 मिनीटे आणि 47 सेकंदामध्ये स्पर्धेचे अंतर पूर्ण करुन अजिंक्यपद पटकावले.  स्पर्धेत 21 किमी पुरुष गटात करण सिंगने प्रथम स्थान मिळवले आहे.

‘स्मार्ट सिटी, स्मार्ट मॅरेथॉन’, असं आजच्या स्पर्धेचं ब्रीदवाक्य होतं. स्पर्धेसाठी देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू दाखल झाले होते. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी स्पर्धेला फ्लॅगऑफ केल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 12 वर्षांखालील लहान मुलांसाठी, 18 वर्षांखालील किशोरवयीन मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिक आणि रन फॉर स्मार्ट सिटीची स्पर्धा आय़ोजित करण्यात आली होती. महिलांच्या १० कि.मी. अंतर स्पर्धेत आरती पाटील (१.२७.४७), प्राजक्ता गोडबोले (१.२८.२५) आणि अक्षय्या जडियार (१.३५.३४) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. 

महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजन विचारे, आमदार सुभाष् भोईर, प्रताप सरनाईक तसेच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी रोख रूपये 75 हजार तसेच मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. गतवर्षीपेक्षा यंदा या स्पर्धेत अधिक स्पधर्धकांनी आपला सहभ्ाग नोंदविला. गेल्यावर्षी 21 हजार 700 तर या वर्षी 22 हजार 760 स्पर्धक सहभागी झाले होते.

सकाळी 6.30 वा. या स्पर्धेला सुरूवात झाली. 21 किमी स्पर्धेला महापौर मिनाक्षी शिंदे यांच्‍या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला प्रारंभ करण्‍यात आला. त्‍यानंतर टप्‍प्‍या टप्‍प्‍याने सुरू झालेल्‍या विविध गटातील स्पर्धाना राज्‍याचे सार्व. बांधकाम (उपक्रम), सार्व. आरोग्य मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवित स्पर्धकांना शुभेच्‍्छा दिल्या.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.