Maharashtra Kesari Harshavardhan Sadgir नाशिकचा हर्षवर्धन ठरला महाराष्ट्र केसरी 2020

कुस्तीच्या कारकिर्दीत महत्वपूर्ण असलेल्या मनाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती 2020 स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीरने थरारक विजय मिळवत नाशिकच्या क्रीडा इतिहासाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळकेचा अखेरच्या सेकंदाला गुण मिळवत ३-२ असा पराभव करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. Maharashtra Kesari Harshavardhan Sadgir

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आपल्या गदेसह…

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरविण्यात आलं आहे.

पुण्याच्या म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्या तालमीतले आहेत.

दोघांनाही एकमेकांची बलस्थानं आणि कच्चे दुवे माहिती असल्याने पहिल्या डावात अति बचावात्मक खेळ बघायला मिळाला. अति बचावात्मक कुस्ती खेळल्यामुळे पंचांनी शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला. दुसऱ्या डावातही दोन्ही मल्ल एकमेकांना वरचढ होण्याची संधी देत नव्हते.

दुसरा डाव संपायला येत असताना हर्षवर्धननेही एक गुण कमावत बरोबरी साधली. मात्र शेवटच्या 1 सेकंदात हर्षवर्धनने निर्णयाक डाव टाकत महत्वाच्या दोन गुणांची कमाई करत मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. Maharashtra Kesari Harshavardhan Sadgir

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.