नाशिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचाच असेल : सामंत

नाशिक : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे प्रचंड यश शिवसेनेला मिळाले आहे. युती होवो अगर न होवो मात्र नाशिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच राहील, असे प्रतिपादन संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी केले. नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या जि.प. सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, उपनेते बबनराव घोलप, आ. राजाभाऊ वाजे, आ. अनिल कदम, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, धनराज महाले, उदय सांगळे, दत्ता गायकवाड, संदीप गुळवे उपस्थित होते.
सामंत पुढे म्हणाले, जिल्ह्यात २५ अधिक १ असे २६चे संख्याबळ शिवसेनेकडे आहे. आपले संख्याबळ पाहता कोणत्याही स्थितीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल. जि.प.वर भगवाच फडकणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. सत्ता स्थापणेसाठी अजून ११ उमेदवारांची मदत घ्यावी लागणार आहे. राज्यात सर्व प्रकारचे युतीचे निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अधिकारात आहेत. पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम असणार आहे. मात्र त्याची अंमलबजावणी आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना लक्षात आणून दिले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.