नाशिक : तपमानाची चाळीशी पार गेल्या १० वर्षातील मार्च मधील सर्वाधिकतपमान

नाशिक : थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात आज तपमान चाळीशीच्या वर गेले. आज शहरातील तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. गेल्या दहा वर्षातील मार्च महिन्यातील सर्वाधिक तपमानाची नोंद झाली. मालेगाव शहरात ४२.४ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. नाशिक शहराच्या इतिहासात मार्च महिन्यातील सर्वाधिक तपमानाची नोंद ४०.४ अंश सेल्सिअस असे नोंदवले गेले आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्र राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने यावर्षी हा पारा ओलांडून नव्या सर्वाधिक तपमानाची नोंद होण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वत्रच तापमानाचा पारा वाढला आहे. येत्या 48 तासात राज्यात सर्वत्र हवामान कारडे राहण्याची शक्‍यता आहे. नाशिक शहरात ही गेले दोन दिवसांपासून तापमानाचा पारा हा ३८  अंश  आहे.त्यात येत्या दोन दिवसात वाढ होण्याची शक्‍यता आहे.सध्या मार्च  महिन्यात शहरात चांगलाच उकाडा जाणवू लागला आहे.दुपारी उन्हाचे चटके आणि रात्री सुसह्य  असे वातावरण सध्या आहे. शहरातील किमान तापमान अठरा  अंशापर्यंत खाली घसरले आहे.

काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असून यंदाचे सर्वाधिक ४0.१  अंश तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळपासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. गेल्या १० वर्षात मार्चमधील सर्वाधिक तपमान नोंदविले गेले आहे.
चार दिवसांपासून उन्हाच्या झळा बसत आहेत. तर तपमान ३८ अंश सेल्सिअस असे नोंद होत होते. सकाळी दहानंतरच उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. उन्हापासून रक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी म्हणून पांढर्‍या रंगाचे कपडे घालून तसेच पूर्ण चेहर्‍याला रूमाल बांधून महिला, पुरूष बाहेर पडत आहेत. यंदाचे सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने बाहेर पडलेल्यांची दमछाक होत आहे.
शहरातील जुने नाशिक, एम जी रोड आणि अशोकस्तंभ, आरके या मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांवर नेहमी वर्दळ असते. मात्र दुपारी शुकशुकाट जाणवत होता.
उन्हापासून बचावासाठी टोपी, रूमाल, गॉगल खरेदी करताना नागरिक आढळून येत आहेत.  अचानक वाढलेल्या तापमानामुळे सनस्ट्रोकची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी शक्यतो सकाळच्या वेळी कामे आटोपून दुपारी आराम करावा, लहान मुलांना उन्हात खेळू देवू नये तसेच उन्हापासून रक्षण करण्यासाठी पांढरे कपडे वापरावेत. काळ्या कपड्यांचा अजिबात वापर करू नये.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.