विहितगावचा तलाठी सुट्टीसाठी  स्वित्झलॅडला, झाले त्याचे  निलंबन  

नाशिक : युरोप येथील  स्वित्झलॅड येथे जाणे म्हणजे  हे सामान्य माणसाच्या आयुष्यातील एक आर्थिक  दिव्य स्वप्न आहे. मात्र नाशिकच्या विहितगाव येथील एका तलाठी सुट्टीसाठी येथे गेले आहेत. तेही कार्यालयाची परवानगी न घेता, यावर चौकशी झाली असता मंत्रालयातून आदेश आल्याने त्याचे निलंबन करण्यात आले आहे.nashik vihitgoan talathi summer holidays visiting Switzerland

कार्यालयाची परवानगी न घेता विदेशात गेल्याच्या कारणावरून तालुक्यातील विहितगाव येथील तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे.तर दुसरीकडे राज्याच्या महसूल सचिवाशी संबंधित व्यक्तीच्या जमीनविषयक नोंदी घेण्यास विलंब केल्याने मंत्रालयातून आलेल्या दबावातूनच जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे जोरदार  चर्चा आहे.

विहितगाव येथील तलाठी रमेश शंकर उगले यांच्या कामकाजाविषयी तक्रारी प्रशासनाला आल्या आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी  यांनी प्रांत यांना  त्यांच्या कार्यालयाची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, तपासणी केली असता, त्यात गंभीर दोष आढळले आहेत. तर दुसरीकडे  या विषया संदर्भात उगले यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली असता, याचवेळी तलाठी उगले हे कुटुंबासह युरोपात  स्वित्झलॅड येथे गेल्याचे प्रशासनाच्या समोर आले आहे.उगले यांनी त्यांच्या कार्यालय प्रमुखाची अनुमती न घेतल्याची बाब गंभीर मानली जाऊन दोन दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

साभार विकिपीडिया 

स्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी – म्हणजे राज्यांनी – बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झ्युरिक, बासल व लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत.

पारंपारिक काळापासून स्वित्झर्लंड तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम आहे. जगात शांतता राखण्यावर स्वित्झर्लंडने कायम भर दिला आहे. २००२ सालापर्यंत स्वित्झर्लंडने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सामील होण्यास नकार दिला होता. सध्या स्वित्झर्लंड युरोपियन संघाचा सदस्य नसलेला युरोपामधील एकमेव आघाडीचा देश आहे. रेड क्रॉस ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा उगम येथेच झाला.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi Your Name and city  and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.