नाशिक जिल्हयातील 15विधानसभांसाठी दि.4 सप्टेंबर रोजी भाजपा इच्छुकांच्या मुलाखती

नाशिक: येत्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पाश्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे नियोजन  बुधावार दि.4सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आलेले आहे. सदर मुलाखती भाजपा वसंतस्मृती कार्यालय, एन.डी.पटेल रोड, नाशिक  येथे होणार आहेत. नाशिक जिल्हयातील15 विधानसभा मतदार संघातील भाजपा इच्छुक उमेदवारांसाठी या मुलाखती होत आहेत. या मुलाखती नगरविकास राज्यमंत्री योगेशजी सागर व उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल , भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, प्रदेश चिटणीस लक्ष्मणराव सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

मुलाखतीपूर्वी  सकाळी 9  ते  दुपारी12 वाजेपर्यत नाशिक शहर कोर कमिटी बैठक‍ व मुलाखती, दुपारी12 नंतर नाशिक जिल्हा कोर कमिटी, मालेगाव शहर कोर कमिटी यांची बैठक‍ व मुलाखती संपन्न होणार आहे. त्यानंतर इच्छुक उमेदवारांची मुलाखतींना सुरुवात होईल अशी माहिती नाशिक भाजपा शहराध्यक्ष  गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादा जाधव, मालेगाव शहराध्यक्ष विवेक वारुळे यांनी माहिती दिली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.