त्र्यंबकेश्वर येथे पुरोहिताने केला मुलीवर अत्याचार
नाशिक : कालसर्प विधी साठी इंदौर येथून आलेल्या भाविकाच्या आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची जोरदार चर्चा त्र्यंबकेश्वर येथे आहे. मात्र या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तड जोडीची भूमिका घेतली असून त्यांनी फक्त मारहाण झाल्याची नोंद केली असून, स्थानिक पुरोहित आणि राजकीय दबाव वापरून गुन्हा दाखल करवून घेतला नाही. या प्रकरणात लहान बालिकेच्या परिवारावर मोठा दबाव टाकला आहे. ही घटना घडली याची नगरात जोरदार चर्चा आहे. मात्र कोणीही समोर येवून बोलण्यास तयार नाही. तर माध्यमांनी सुद्धा गप्प राहणे पसंत केले आहे.
यामध्ये एक परिवार कालसर्प विधी साठी त्र्यंबक येथे आला होता. त्यांचे एका पुरोहीतासोबत पूजेचे सर्व सोपस्कर ठरले होते. तशी विधी पूर्ण झाला होता. मग कुशावर्त येथे स्नान करण्यासठी परिवार गेला मात्र आठ वर्षीय मुलगी पुरोहिता सोबत थांबली होत. या वेळी या मुलीचा फायदा घेत तिला लज्जा निर्माण होइल असे शारिरीक गैरवर्तन केले होते. मात्र त्याच वेळी मुलीचे पालक आले आणि मुलगी भीत भीत पळत सुटली, ती इतकी घाबरली होती की तिला काय झाले हे सागता येत नव्हते. तर ही गोष्ट सार्वजनिक होताच या मुलीवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून जबर दबाव टाकला गेला. पोलिसांनी नेहमी प्रमाणे तडजोडीची भूमिका घेतली असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वाना माहित आहे मात्र पुढे येत नाही. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मंत्रालयातून दबाव आणला गेला आहे. मात्र आता सामाजिक संघटना पुढे येत असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.