आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय अजिंक्य

नाशिक : येथील शिवाजी स्टेडीयम येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिकने करंजाळीच्या महंत जमुनादास महाराज महाविद्यालयाचा २३ विरुद्ध १५ असा ८ गुणांनी पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत नाशिक विभागातील ४८ संघांनी सहभाग नोंदविला होता. nashik sports district inter college kabaddi championship hire mahavidyalay won

 खेळासाठी महत्वाचे सर्व ! इथे क्लिक करा 

शनिवारी (दि. १५) सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महंत जमुनादास महाराज महाविद्यालय करंजाळीने मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या सायखेडा कॉलेजचा ३३ विरुद्ध १५ ने असा १८ गुणांनी पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, एल.व्ही.एच. पंचवटी महाविद्यालयाने सांघिक खेळाच्या जोरावर के.के वाघ आर्ट्स सायन्स कॉलेज चांदोरीचा १२ गुणांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली.

अंतिम फेरीच्या रंगदार सामन्यात लोकनेते व्यंकटराव महाविद्यालयाने प्रारंभापासूनच आपल्याकडे आघाडी राखली होती. पंचवटी महाविद्यालयाच्या समाधान काकडे, भरत मालुसरे, शाकीब सैय्यद यांच्या आक्रमक चढायाच्या जोरावर करंजाळीच्या महंत जमुनादास महाराज महाविद्यालयाचे संरक्षण भेदत २३ विरुध्द १५ असा ८ गुणांनी पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पराभूत संघाकडून शुभम बारमाटे, आकाश इंगळे यांनी पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. विजयी संघाला प्रा. संतोष पवार, राम कुमावत, किरण गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी रवि नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. nashik sports district inter college kabaddi championship hire mahavidyalay won

खेळासाठी शक्ति नक्की क्लिक करा ! स्पोर्ट एनर्जी ड्रिंक !

विजयी व उपविजयी संघांना दादासाहेब बिडकर, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. नरेंद्र पाटील, विभागाचे सचिव प्रा. डॉ. दीपक जोंधळे, निवड समिती सदस्य प्रा. डॉ.दत्ता शिंपी, यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. डॉ.मीनाक्षी गवळी, प्रा. विजय पाटील, प्रा. संतोष जाधव, प्रा, नामदेव काकड, प्रा. प्रदीप वाघमारे, प्रा. कोल्हे, आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत पंच म्हणून अनिल अहिरे, शरद पाटील, विजय ढिकले, चंद्रकांत ढिकले, मेघनाथ माळोदे, दत्ता जाधव रवि खैरे, राजेश डांगळे, रेहमान शेख, विलास मोरे, सुनील केदारे, दिनेश मार्तंड, हमीद हसन, अभिलाषा दातीर, प्रियंका लांडगे, काजल जठार, अभिलाषा मोहिते, प्रतिक शिंदे यांनी काम पाहिले. nashik sports district inter college kabaddi championship hire mahavidyalay won

 व्यायामासाठी उत्तम एम आय चे घड्याळ !

फोटो कॅप्शन:  आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेतील विजेता लोकनेते व्यंकटराव महाविद्यालयाच्या संघासमवेत प्रा. संतोष पवार, प्रा. डॉ. नरेंद्र पाटील, किरण गुंजाळ, राम कुमावत, छत्रपती पुरस्कार विजेती रोशनी गुजराथी, आदि.

nashik sports district inter college kabaddi championship hire mahavidyalay won
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.