‘स्मार्ट सिटी’ मुंढे, थविल यांची प्रायव्हेट कंपनी नाही; सत्ताधारी-विरोधक एकवटले

नाशिककरांनाच डावलत असल्याचा आरोप; महापौरांनी घेतली थाविलांची शाळा

नाशिक : लाेकांना विश्वासात न घेता स्मार्ट सिटीची कामे होत आहेत. गावठाण विकास असो वा प्रोजेक्ट गोदा यामध्ये नाशिकची काहीही माहिती नसलेले चार लोक एकतर्फी निर्णय घेतात असा आरोप करत शहराचे काही वाटोळे झाल्यास हेच लोक जबाबदार असतील असा दम महापौर रंजना भानसी तसेच स्मार्ट सिटी कंपनीत संचालक असलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला दिला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे आणि स्मार्ट सिटी कंपनीचे प्रकाश थवील यांच्यावर लोकप्रतिनिधींची नाराजी आणि खदखद पुन्हा एकदा दिसून आली. Nashik Smart City is

वर नमूद केलेल्या दोनही महत्वाच्या आणि बहुसंख्य नाशिककरांना प्रभावित करणाऱ्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी शनिवारी (दि. 17) एक बैठक बोलाविण्यात आली होती. तेथे या घडामोडी घडल्या.

स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून होणाऱ्या मनमानीबाबत झालेले आरोप असे :

५०० कोटी किंमत असलेल्या या प्रकल्पांची माहिती देण्यासाठीची ही बैठक पलुस्कर सभागृहासारख्या छोट्या सभागृहात तीही घाई घाईने बोलावून घेण्यात आल्याने निर्णय प्रक्रियेत नाशिककरांना डावलण्याचा उद्देश असल्याचे आरोप करण्यात आला. Nashik Smart City is

घाई घाईने बैठक बोलावून बैठकीला लोक येऊ नये याची तजवीज करण्यात आली. कामे करताना ‘सोशिक’ नाशिककरांचे नाशिक समजून घ्या असा सल्लावजा इशारा कॉंग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी दिला. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिकचा सत्यानाश करू नका.

स्मार्ट सिटीची कामे लपून का करता असा प्रश्न गुरमीत बग्गा यांनी विचारला. चुकीची कामे करू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. Nashik Smart City is

सभागृह नेते दिनकर पाटील यांनी महापालिका मुंढे यांना आंदण दिलेली नसल्याचे म्हटले.

महापौरांनी घेतली थाविलांची शाळा

स्मार्ट सिटी अंतर्गत पुनर्निर्माण करण्यात आलेल्या नेहरू उद्यानात सांगा किती व काेणाचे पुतळे अाहे असा प्रश्न सीईओ प्रकाश थविल यांना महापौर रंजना भानसी यांनी विचारला. मात्र त्यांना नावे सांगता अाली नाहीत. त्यावर असे कसे तुम्ही स्मार्ट सिटीचे अधिकारी? असा सवाल केला. चार लोक म्हणजे स्मार्ट सिटी नव्हे. उदघाटन पालकमंत्री व आमदारांच्या हस्ते करण्याच्या सूचना दिल्या असताना परस्पर लोकार्पण झाले. हिटलरशाही चालू देणार नाही असाही इशारा दिला.

का झाला एवढा वाद? कसली आहे ही खदखद?

संचालकांना डावलून परस्पर निर्णय, महाकवी कालिदास मंदिर आणि अशाच पद्धतीने नेहरू उद्यानाचे झालेले लोकार्पण करणे, महापौरांचा अपमान करणे असे आरोप करत निषेध नोंदवत लोकप्रतिनिधींनी बैठकीतून काढता पाय घेतला. यावेळी उपस्थितांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे असे आवाहन प्रशासनाला केले.

काय प्रोजेक्ट गोदा? इथे वाचा…

Nashik Smart City is
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.