स्वच्छतेसाठी लोकसहभाग महत्वाचा, प्लॅस्टिकमुक्त भारतासाठी नाशिक उदाहरण असावे – जावडेकर

स्वच्छतेसाठी लोकसहभाग महत्वाचा, प्लॅस्टिकमुक्त भारतासाठी नाशिक उदाहरण असावे – जावडेकर

नाशिक शहरातील नागरिकांनी लोकसहभाग दाखवला तर चमत्कार होवू शकतो.आपण स्वच्छता बघायला बाहेर जातो मात्र आपण आपल्या देशात तसा बदल घडवू शकतो. स्वच्छतेबाबत इंदूर भारतात प्रथम आले आहे प्लॅस्टिकमुक्त भारत हे समाज बदलण्याचे आंदोलन आहे. त्याचा शुभारंभ नाशिकमधून झाला आहे. ही नव्या नाशिकची सुरुवात आहे. त्यामुळे एक आदर्श म्हणून नाशिकने आता आपली नवीन ओळख बनवावी आणि नाशिक प्लॅस्टिकमुक्त व्हावे असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केले

प्रकाशजावडेकर यांनी प्रभाग १८ मधील स्वच्छता आणि प्लॅस्टिकमुक्त मोहिमेला प्रारंभ केला. आपल्या देशात सत्ता बदल झाला आणि खरच बदल दिसून आला आहे. नरेंद्र मोदी यांची तीन वर्षे अमुलाग्र बदल घडवणारी आहेत. त्यांनी आपल्या देशातील अवगुण हेरून चांगला गुण अर्थात स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. त्या यश येत आहे.आपल्या देशात या मोहिमेत आपण साडेतीन कोटी शौचालये बांधण्यात आली तर १ लाख ७० हजार खेडी हगणदारीमुक्त करण्यात आली. उघड्यावर शौच करणे थांबले आहे.

मात्र दुसरीकडे प्रदूषण मोठी समस्या असून त्यामध्ये प्लास्टिक मोठी समस्या समोर उभी आहे. प्रत्येक गाव आणि शहरात प्लॅस्टिकची समस्या गंभीर झाली आहे. आपल्या देशातील अनेक शहरांमध्ये रोज १५ हजार टन प्लॅस्टिक जमा होते. पैकी फक्त नऊ हजार टन गोळा केले जाते. वर्षाला वीस लाख टन प्लॅस्टिक तसेच राहते. जनावरे तसे समुद्रातील माशांच्या पोटात ते जाते. पर्यावरणाचीही मोठी हानी होते.त्यामुळे आपण आता नवीन मोहीम सुरु करतोय ती म्हणजे प्लास्टिक मुक्त देश आणि या मोहिमेची सुरुवात नाशिक मधून केली जातेय. हे करत असताना आपण सर्वांनी लोकसभाग एकत्र याबे आणि नाशिकला देशातील लोकांपुढे एक उदाहरण म्हणून ठेवावे ज्यामुळे नाशिक सह इतर शहरांना प्रेरणा मिळेल. मी पुन्हा नाशिका येणार असून या मोहिमेची प्रगती बघणार आहे.त्यामुळे आता नाशिककरांनी कामाला लागले पाहिजे असे जावडेकर यांनी मत व्यक्त केले.

महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी, वसंत गिते, विजय साने, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, बाजीराव भागवत, सुनील बागूल, कामगार नेते पी. एन. आडके, नगरसेवक प्रा. शरद मोरे, आदींची उपस्थिती होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.