Nashik Satana doctor coronavirus नामपूर : डॉक्टरांना कोरोनाची लागण; रुग्णालय सील

नाशिक : बागलाण तालुक्यातील नामपूर रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नामपूर आरोग्य केंद्र सील करण्यात आले आहे. तसेच येथील स्टाफची तपासणी केली जात आहे. Nashik Satana doctor coronavirus

नामपूर रुग्णालयातील करोनाबाधित वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथून ये-जा करतात. मालेगावात कोरोनाने थैमान घातले असतानाच आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्नीपासून कोरोनाची बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समजते.

ज्या रुग्णांनी त्यांच्याकडे उपचार घेतले असतील त्यांनी त्वरित याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावयाची आहे. वेळीच सहकार्य करून कोरोनाचा वाढता फैलाव रोखता येईल यामुळे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मोसम खोऱ्यात येणाऱ्या गावांमध्ये आज सकाळपासून दवंडी पिटवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

मालेगावमधून कोरोनाने बागलाण तालुक्यात शिरकाव केला असला तरीदेखील कोणीही सोशल मीडियात पसरणाऱ्या अफवांना बळी पडू नये. प्रशासन जी माहिती देईल ती गृहीत धरावी धरावी असे आवाहन करण्यात आले आहे.

नामपूर रुग्णालयात आलेले रूग्ण किंवा नातेवाईक वरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले असतील तर त्यांचे सर्व्हेक्षण करून तात्काळ  होम कॉरन्टाईन करण्याचे काम शासन पातळीवरून सुरू झाले आहे. Nashik Satana doctor coronavirus

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.