सराफांचा एल्गार मनपा विरोधात उच्च न्यायालयात तर फुलबाजार देखील काढा म्हणून आक्रमक

नाशिकमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने प्रशासनाचे पितळ उघडे पाडले आहे. नागरिक रस्त्यावरील खड्ड्यामुळे वैतागले आहेत. दुसरीकडे गावातील सराफ देखील आता मनपा विरोधात एकत्र आले असून उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

यंदा पावसाळ्यात दोनदा सराफ बाजार पाण्याखाली गेल्यामुळे विस्कळीत झाला होता. आता सराफ व्यवसायिक, व्यापारी व पर्यावरण अभ्यासकांची तज्ज्ञ समिती गठीत करून येत्या ३० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहेत. याबाबत सराफ व्यावसायिकांच्या बुधवारी बैठकीत हा निर्णय झाला आहे. सराफ बाजारात आगस्ट महिन्यात पहिल्याच रविवारी गोदावरीला आलेल्या महापुराने सराफ बाजारात पाणी घुसून अनेक सराफी पेढ्या पाण्याखाली गेल्या होत्या. 

 त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. याच प्रकारे परतीच्या जोरदार  पावसामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी पुनरावृत्ती झाली , तर ६ ऑक्टोबरला गंगेला पूर नसतानाही सराफ बाजारात तीन ते चार फूट पाणी साचून अनेक दुकानांमध्ये शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये महापालिका व्यवस्थापनाविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे.

पूरपरिस्थिती भूयारी गटार आणि पावसाळी नाल्यांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने उद्भवत असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून केला आहे. सोबतच सराफ बाजारात बसणाऱ्या फुलविक्रेत्यांचे या भागात मोठ्या प्रमामात अतिक्रमण आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांना वाहतूक कोंडीसह अनेक मोठ्या समस्यांना सामना नेहमीच  करावा लागतो आहे.

सराफ बाजारातील पूर स्थिती

सराफांनी एकत्र येऊन महापालिके विरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून तीस दिवसात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत पर्यावरण प्रेमी व अभ्यासक देवांग जाणी, समीर गायधनी, हेमंत जगताप, नाशिक सराफ असोसिएश्नचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, घाऊक किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, मेहूल थोरात, सचिन वडनेरे, गिरीश नवसे, फेरीवाला व्यस्थापनसमितीचे राजेंद्र दिंडोरकर आदिंचा समावेश केला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.