जिल्हा महापालिका आणि जिल्हा परिषद मतदानासाठी सज्ज

नाशिक जिल्हा मतदानासाठी सज्ज

नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक महानगरपालिका महानगरपालिकेसोबतच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यासाठी मतदान होत आहे. महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी शहरातील १४०७ केंद्रांवर मतदानाची सुविधा करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ७३ गट व १४६ गणांसाठी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. रविवारी मतदान बूथ निरीक्षकांनी सर्व सामग्री ताब्यात घेतली आहे. याशिवाय सोमवारी रंगीत तालीम घेण्यात आली आहे. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’ (इव्हीएम) वितरीत करण्यात आले आहेत. तर बूथ निरीक्षकांना नियमावली देण्यात आली आहे.

पोलीस बंदोबस्त

१६ सहायक पोलीस आयुक्तांसह १२९ पोलीस निरीक्षक, २८९ पोलीस उपनिरीक्षक आणि पाच हजारांवर पोलीस कर्मचार्‍यांना निवडणूक ‘ड्युटी’वर आहेत.

मतदान केंद्रांचे वर्गीकरण  

शहरात एकूण एक हजार ४०८ मतदानकेंद्रे आहेत, त्यातील ४४२ ठिकाणांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. यात २७९ संवेदनशील, ८६ अतिसंवेदनशील आणि ७७ क्रिटीकल केंद्रांचा समावेश आहे.

पोलिसांची विशेष मोहीम
संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राजवळ अनावश्यक गर्दी होवूच नये याकरीता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरात असलेल्या व्यावसायिकांची तसेच रहिवासी क्षेत्रातील नागरिकांची नोंद पोलिसांकडून केली जात आहे.त्यांच्या घरातील इतर व्यक्तींची महिती आणि संख्या नमूद केली जात आहे. पोलिसांनी प्रथमच असे पाऊल उचलले आहे. मतदान दिवशी जर एखाद्या घरात ठराविक पक्षाचे कार्यकर्ते आणि नेहमीपेक्षा अधिक व्यक्ती आढळून आले, तर संबंधित घरमालकावर  जबाबदारी निश्चित करून कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे.

उमेदवारांची संपूर्ण माहिती देणार तक्ता

शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी उमेदवारांची संपूर्ण माहिती असलेला तक्ता लावण्यात येणार आहे. या तक्त्यात संबंधित प्रभागातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण, चारित्र्य, संपत्ती अशी सर्वच माहिती झळकणार आहे. या उपक्रमामुळे सुयोग्य आणि लायक उमेदवार निवडणे मतदारांना सोपे होणार आहे.

 

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.