पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
नाशिक : राणे नगरच्या सेंट फ्रान्सिस या नेहमीच वादातीत असलेल्या शाळेमध्ये एक शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला असून ही विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिकते. Nashik Rane Nagar St. Francis teacher molested student parents trashed
सुनील कदम असे शिक्षकाचे नाव असून हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर लगेचच घरच्यांनी शाळा गाठत त्या शिक्षकाला रक्तबंबाळ होईपर्यंत चोप दिला आहे.
शिक्षक सुनिल कदम याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला आधी प्रपोज केलं. तिच्यावर दबाव टाकत नकार दिल्यास नापास करण्याची धमकी देत तिच्या विनयभंग केला आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार सुनिल कदम या आरोपी शिक्षकावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इथे बघा व्हिडिओ :
या घटनेची तात्काळ दखल घेत इंदिरानगर पोलीस ठाण्यात 354 आणि पोस्को 12 कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान हा कदम संधी मिळताच फरार झाला झाला असून इंदिरानगर पोलिसांनी संध्याकाळपर्यंत अटक करू असे सांगितले आहे. Nashik Rane Nagar St. Francis teacher molested student parents trashed
या शिक्षकाने या आधीही मुलींची छेड काढल्याचे प्रकार केल्याचा आरोप या मुलीच्या पालक आणि इतरही पालकांनी केला आहे. शाळेने त्वरित या शिक्षकाला निलंबित केल्याची घोषणा केली आहे.
Nashik Rane Nagar St. Francis teacher molested student parents trashed
आजच्या महत्वाच्या बातम्या : ???
इंदिरा नगर : पोलिसांनी जप्त केल्या 16 तलवारी, दोघांपैकी एक संशयित पंजाबचा
नाशिक मनपाचे बेपत्ता अभियंता पाटील घरी परतले; नाशिक पोलिसांना पुण्यात सापडले
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश, आरोग्य विद्यापीठ प्रशासन झुकले