मागील दोन दिवसांपासून वरुणराजाने जिल्ह्यावर आभाळमाया केल्याने दारणासह गंगापूर धरणाच्या जलसाठयात दमदार वाढ झाली आहे. दारणा धरण 92 टक्के भरले असून त्यातून 9 हजार क्युसेसने विसर्ग सुरु आहे. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून 16 हजार क्यूसेस वेगाने मराठवाड्याकडे पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.14) पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. Nashik Rains Dams Position
जून व जुलै कोरडेठाक गेल्याने जिल्हावासियांची निराशा झाली होती. पण ऑगस्टच्या पंधरवडयापासून मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले असून हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह कोकण, मराठवाडा व विदर्भात देखील धुवांधार पाऊस झाला. जिल्ह्यात उशीराने का होईना पण बुधवार (दि.12) पावसाला सुरुवात झाली. Nashik Rains Dams Position
महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणार्या इगतपुरी तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. सलग तीन दिवस शंभर मिली मीटर पेक्षा जादा पाऊस बरसला. त्यामुळे साडेसात टीएमसी क्षमतेचे दारणा धरण ९२ टक्के इतके भरले असून ९ हजार क्यूसेसने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे दारणाच्या पाणी पातळित वाढ झाली आहे.
तर त्र्यंबकेश्वरमध्येही मुसळधार पाऊस होत आहे. गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अंबोली परिसरात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. गंगापूर धरणाच्या जलसाठयात पाच टक्केंनी वाढ झाली असून ६७ टक्यांवर पोहचला आहे. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.
नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात शंभर टक्के पाणी असून त्यातून जायकवाडिकडे विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यातील इतर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हवामान खात्याने पुढिल एक दोन दिवसात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Nashik Rains Dams Position