नाशिक पेलेटॉन : कडाक्याच्या थंडीत पहिला टप्पा यशस्वी, रविवारी 150 किमीची स्पर्धा

पारितोषिक वितरणासाठी दिग्दर्शक राजकुमार संतोषी, तुषार गांधी राहणार उपस्थित

नाशिक : नाशिक सायकलीस्टतर्फे आयोजित जायंट स्टारकेन नाशिक पेलेटॉन 2109 या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धा शनिवार (दि. 5) जिगरबाज सायकलिस्टसने दाखवलेल्या उत्साहामुळे यशस्वीवणे पार पडला. कडाक्याच्या थंडीतही 15 किमीची स्प्रिंट पेलेटॉन आणि 50 किमीची मिनी पेलेटॉन स्पर्धा एकूण आठ गटांत घेण्यात आल्या. विशेष म्हणजे अंधेरी, मुंबई येथील डॉ. राजू तुकरने या दिव्यांग स्पर्धकाने देखील स्पर्धेत सहभागी होत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याने स्पर्धेचा मुख्य उद्देश यशस्वी होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. Nashik Peloton 2019 Nashik Cyclists Day 1

Nashik Peloton 2019 Nashik Cyclists Day 1

50 किमीची स्पर्धा 18 ते 40 वयोगट (पुरुष), 18 ते 40 वयोगट (महिला), 40 वर्षांपुढील वयोगट (पुरुष), 40 वर्षांपुढील वयोगट (महिला) अशा चार गटांत झाली. 18 ते 40 वयोगट पुरुषांत सुरतचे सचिन शर्मा, सांगलीचे रमेश शेंडगे तर कोल्हापूरचे निलय मुधाळे यांनी अनुक्रमे 1 तास 17 मिनिटे, 1 तास 18 मिनिटे, 1 तास 20 मिनिटे अशी वेळ नोंदवत पहिल्या तीन क्रमांकावर राहिले तर महिलांत अहमदनगरच्या प्रणिता सोमण (1 तास 46 मिनिट), नाशिकच्या रितिका गायकवाड (1 तास 47 मिनिट 11 सेकंद) आणि प्रांजल पाटोळे (1 तास, 47 मिनिट, 14 सेकंद) अशी वेळ नोंदवत पहिल्या तिघांत स्थान मिळवले.
40 वर्षावरील वयोगट पुरुषांत यवतमाळचे नितीन डहाके (1 तास, 29 मिनिटे, 53 सेकंद), मुंबईचे समीर नागवेकर (1 तास, 29 मिनिटे, 59 सेकंद) तर पुण्याचे प्रशांत तिडके (1 तास, 31 मिनिटे) यांनी बाजी मारली. तर महिलांत पुण्याच्या अवंती बिनीवाले, नाशिकच्या नंदा गायकवाड आणि कल्पना कुशारे यांनी पहिल्या तिघींत स्थान पटकावले.

नाशिक सायक्लिस्टसचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, दातार जेनेटिक्सचे मिलिंद अग्निहोत्री, टीम दातार, यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. यावेळी नाशिक सायक्लिस्टसचे उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, पेलेटॉन रेस डायरेक्टर डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन,पेलेटॉन प्रमुख विशाल उगले, तसेच नाशिक सायक्लिस्टस फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

50 किमीची मिनी पेलेटॉन स्पर्धा सिटी सेंटर मॉल पासून सुरुवात होऊन एबीबी सर्कल वरून त्र्यंबक रस्ता मार्गे जव्हार फाटा येथून यु टर्न घेऊन हॉटेल क्लाउड नाईन येथे स्पर्धेचा समारोप झाला.
15 किमी स्प्रिंट पेलेटॉनच्या मुलांच्या 12 ते 15 वर्षे वयोगटात कोल्हापूरचा सिद्धेश पाटील, विजय पाटील आणि उज्वल ठाकरे (ठाणे) यांनी बाजी मारली तर 15 ते 18 वयवर्षे वयोगटात सौरभ काजळे (ठाणे), जितेन जोशी आणि ओम महाजन या नाशिककर सायकलिस्टने पहिल्या तिघांत स्थान मिळवले.

तर मुलींमध्ये 15 ते 18 वयवर्षे वयोगटात गायत्री लोढे (अहमदनगर) आणि अनुजा उगले (नाशिक) यांनी बाजी मारली. 12 ते 15 वर्षे वयोगटात सुजाता वाघेरे (नाशिक), केतकी कदम (सातारा), लीना गंत (नाशिक) यांनी पहिल्या तिघींत स्थान मिळवले.

गेल्या 15 दिवसापासून नाशिक जिल्ह्यात असलेली शीत लहर कायम असतानाही सायकलपटूंची उर्जा वाखाणण्या जोगी होती. ही थंडी महाराष्ट्रभरातून काही स्पर्धकांना स्पर्धेसाठी पोषक वाटल्याचे सांगत रेस पूर्ण केली.

आज रविवारी होणाऱ्या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात 150 किमीची पेलेटॉन स्पर्धा होणार असून स्प्रिंट आणि मिनी पेलेटॉन प्रमाणेच देशभरातून या स्पर्धेत सायकलपटू सहभागी होणार आहेत. पेलेटॉन स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून रविवारी (6 जानेवारी) होत असलेल्या पारितोषिक वितरण समारंभाला सिने दिग्दर्शक राजकुमार संतोषी, महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी, आयपीएस अधिकारी हरीश बैजल राहणार उपस्थित राहणार आहेत.

15 किमी स्प्रिंट पेलेटॉन आणि 50 किमी मिनी पेलेटॉनसह 150 किमीच्या पेलेटॉन विजेत्या सायकलपटूंना आज (दि. 6) होणाऱ्या समारंभात मान्यवरांच्या सन्मानपत्र चषक आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. सायकलपटूसाठी भरघोस बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत नाशिक सायकलीस्टतर्फे नाशिकमध्ये सायकल चळवळ वाढविण्यासाठी नाशिक रँडोनर्स मायलर्स अर्थात एनआरएम या अनोख्या उपक्रमाने 2 वर्ष पूर्ण केली आहेत. असा उपक्रम भारतात प्रथमच राबविण्यात आला असून यामुळे नाशिक पेलेटॉन सारख्या स्पर्धांना स्पर्धकांची संख्या वाढली असल्याची माहिती नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी दिली आहे.

Nashik Peloton 2019 Nashik Cyclists Day 1
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.