येत्या जानेवारीत ‘नाशिक पेलेटॉन – २०१७’ चे आयोजन

शाळेत जाण्यासाठी रचना विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकल्सचे वाटप, सायकलवरून अष्टविनायक दर्शनnashik peloton 2017 news
नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने ‘नाशिक पेलेटॉन २०१७’ ही राष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धा ७ व ८ जानेवारी आयोजित करण्यात येत असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंग बिर्दी यांनी नाशिक क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. गेल्या ५ वर्षापासून सायकलचा वापर वाढवा म्हणून नाशिक सायकलीस्ट फौंडेशन प्रयत्न करत असताना २०१४ साली पहिल्यांदा झालेल्या या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून संपूर्ण भारतातून स्पर्धक सहभागी होत असतात. नाशिकमध्ये विविध केंद्रांवर स्पर्धकांसाठी नोंदणी अर्ज उपलब्ध असून स्पर्धक आॅनलाईन नोंदणीही करू शकणार आहेत.

याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने नाशिकमध्ये २००हून अधिक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल्सचे वाटप करण्याचे ठरविले असून या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पाच सायकल्सचे वाटप रचना विद्यालयातील विद्यार्थ्यांना करण्यात आले.

रस्त्यावरील सायकल स्पर्धा (OnRoad Cycling Race) हा लोकप्रिय क्रीडा प्रकार असून नाशिक पेलेटॉन ही स्पर्धा देखील हा खेळ लोकप्रिय करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. दीर्घ पल्ल्याची (१५० किमी) नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या अवघड घाटवळणांवरून नाशिक पेलेटॉनचे स्पर्धक मार्गक्रमण करतील.

अशी होईल स्पर्धा :

१५० किलोमीटर सायकल स्पर्धा : नाशिक-कसारा–घोटी–कावनई–त्र्यंबकेश्वर–नाशिक

* (१८ ते ४० वयोगट) * (४० वर्षापुढील गट)

पन्नास किलोमीटर सायकल स्पर्धा : नाशिक – त्र्यंबक – नाशिक

* १८ ते ४० वयोगट (पुरुष) * १८ ते ४० वयोगट (महिला)

* ४० वर्षांपुढील वयोगट (पुरुष) * ४० वर्षांपुढील वयोगट (महिला)

पंधरा किलोमीटर सायकल स्पर्धा :

* १४ ते १८ वयोगट (मुले)

*  १४ ते १८ वयोगट (मुली)

जॉय राईड : हौशी सायकलीस्ट (सर्व वयोगट)

बक्षिसाची एकूण रक्कम : १० लाख

घाटातील अंतर कमीतकमी वेळेत पार करणाऱ्या स्पर्धकाला ‘ घाटाचा राजा ’ किताब

सायकलिंग विषयी माहिती व्हावी, सायकल्सचा वापर वाढवा जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिक मधील चवळ पुढे नेण्याचा नाशिक सायकलीस्ट असोसियेशनचा प्रयत्न राहणार आहे. सायकलचा जास्तीत जास्त वापर वाढवावा, शहरे प्रदूषणमुक्त व्हावीत हा देखील या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.

यावेळी नाशिकचे प्रसिद्ध सायकलीस्ट डॉ. हितेंद्र महाजन व डॉ. महेंद्र महाजन, नाशिक सायकलीस्टचे उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, योगेश शिंदे, किशोर काळे, सदस्य तुकाराम नवले, डॉ. मनीषा रौंदल, शैलेश राजहंस, विजय पाटील, रत्नाकर आहेर, मनीषा भामरे, नीता नारंग आदी उपस्थित होते.

‘नाशिक पेलेटॉन – २०१७’ स्पर्धचे फॉर्म नाशिकमध्ये खालील पत्त्यांवर उपलब्ध

१) हॉटेल करी लीव्ह्स, गंगापूर रोड  २) ऑप्टीव्ह्यु, मेहेर सिग्नल  ३) आत्मा शोरूम, नाशिकरोड  ४) शालीमार ज्यूस सेंटर , देवळाली  ५) शिवशक्ती सायकल्स, डीजीपी नगर, अंबड  ६) लुथरा एजन्सीज, जुना गंगापूर नाका ७) डीकेथलॉंन, जैन मंदिरा समोर, विल्होळी

या स्पर्धेसाठी ऑनलाईन (nashikcyclists.com) तसेच मोबाइल अँपच्या माध्यमातूनही रजिस्ट्रेशन सुरु आहे.  फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी २०१७ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी nashikcyclists.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सायकलवरून अष्टविनायक दर्शन

नाशिक सायकलीस्टचे देविदास आहेर आणि प्रतिभा देविदास आहेर हे सायकलवरून अष्टविनायक दर्शन वारी करणार आहेत. आज म्हणजेच ११ नोव्हेंबर ही दर्शनवारी सुरु होईल. मागच्या वर्षी आठ दिवसात पूर्ण झालेली ही वारी यावेळी केवळ ६ दिवसात पूर्ण करण्याचा आहेर यांचा मानस आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी भारतीय सायकल दिवस साजरा करण्यात यावा म्हणजेच महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवावी असा संदेश देत वारी करण्याची इच्छा असल्याचे आहेर यांनी सांगितले.

१९ नोव्हेंबरला सीआयआय सह गोल्डन राईड

भारतीय औद्योगिक संघ आणि नाशिक सायकलीस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १९ नोव्हेंबर रोजी ‘गोल्डन राईड’ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय औद्योगिक संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी दिली. उद्योगपती, डॉक्टर्स, इंजिनीअर्स व सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी सायकल चालवल्यास त्यांच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या लोकांना स्फूर्ती मिळेल असा यामागे उद्देश असल्याचे ते बोलले. सायकलिंग या खेळासह दैनंदिन जीवनातही सर्वसामान्यांनी सायकलचा वापर करावा असे आवाहन करत गोल्डन राईड मध्ये जास्तीत जास्त लोकांना जोडून घेण्याची उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.