नाशिक आणि गाडी जाळपोळ हे वाईट समीकरण झाले आहे. कुरापत काढून किंवा दहशत पसरावी या करिता गाड्या जाळपोळ केली जाते. पुन्हा असा प्रकार पंचवटी परिसरात नांदूर शिवार येथे घडला आहे. यामध्ये चंडेश्वरी नगर येथिल घरासमोर सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमाराला स्कोडा लॉरा क्रमांक ( एम. एच ०४ डी. एन. ९५९३), टेम्पो क्रमांक (एम. एच. १५ ए. जी. ४४०७), तसेच फॉक्स वेगन क्रमांक (एम. एच. ०४ एम. एम. १५५) गाड्या जाळल्या आहेत.
पोलिसांनी सांगितल्या नुसार जुने भांडण काढून हा प्रकार घडला आहे. यामध्ये नांदूरगावातील संशयित आरोपी दिपक महादू सुर्यवंशी, राजू मधुकर करंडे या दोघांनी पेटवून दिल्या आहेत. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.