नाशकात ५व्या युवा राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

नाशिक : भारतीय तलवारबाजी महासंघाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन, नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि कै. कोंडाजी नामदेव दुधारे बहुउदेशिय मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात ५ व्या युवा राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अशोक दुधारे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. दि. २९ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान संत जनार्धन स्वामी मठ, औरंगाबाद रोड, तपोवन,पंचवटी नाशिक येथे ही स्पर्धा रंगणार आहे. Nashik organising 5th Youth National Fencing Championship sports news

या स्पर्धेत महिला व पुरुष या दोन्ही गटाच्या वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारातही इपी, फाॅईल आणि सॅबर या पद्धतीच्या स्पर्धा होणार आहेत.

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह १) आंध्रप्रदेश २) जम्मू-काश्मीर ३) हिमाचल प्रदेश ४) चंडीगड ५) पंजाब ६) हरियाणा ७)दिल्ली ८) उत्तर प्रदेश ९) छत्तीसगड १०) झारखंड ११) बिहार १२) मध्य प्रदेश १३) गोवा १५)गुजरात १६) दिव-दमण १७) दादरा-नगर हवेली १८) कर्नाटका १९) ओरिसा २०) केरळ २१) तामिळनाडू २२) तेलंगाना २३) प. बंगाल २४) आसाम २५) मणिपूर २६) मेघालय २७) मिझोराम २८) पॉन्डेचेरी २९) सेनादल ३०) नेव्ही असे ३१ संघ सहभागी होणार आहेत. Nashik organising 5th Youth National Fencing Championship sports news

या स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्यात येणार असून निवड झालेला संघ दि. १३ ते १८ ऑक्टो, २०१८ दरम्यान मनिला, फिलिपिन्स येथे होण्याऱ्या आशियाची स्पर्धेत सहभागी होणार आहे.

विशेष बाब म्हणजे या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे थोबासिंग, अक्षय देशमुख, तुषार आहेर, रोशनी मुर्तडक, स्नेहल पवार(सर्व महाराष्ट्र), ध्रुव वालिया, सिमरन कौर, भुषण प्रीत, हरप्रीत कौर,हरविंदर सिंग (सर्व पंजाब), ज्योतिका दत्ता (हिमाचल प्रदेश), करण गुजर, जेटली, शिवा महेश (सर्व आर्मी), बिंदू कुमारी, सर्जीन(मणिपूर) हे खेळाडू सहभागी होणार आहेत. या सर्वांचा खेळ प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने नाशिककरांना अनुभवण्यास मिळणार आहे.

५व्या युवा राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेची वैशिष्ट्ये :

  • या स्पर्धेसाठी ७ अद्ययावत मैदाने तयार करण्यात आले आहेत.
  • स्पर्धेतील सर्व सामन्यांत इलेक्ट्रॉनिक अँपरेटस उपकरणे वापरून खेळविल्या येणार आहेत.

Nashik organising 5th Youth National Fencing Championship sports news

दरम्यान स्पर्धेचे उद्घाटन स्थायी समितीच्या हिमगौरी आहेर अडके आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रवी नाईक यांच्या हस्ते २९ मार्च रोजी दुपारी ५ वाजता होणार आहे. यावेळी फेन्सिंग असो. ऑफ इंडियाचे सचिव बशीर खान, विभागीय शिक्षण अधिकारी वैशाली वीर (झनकार), सिंहगड इंस्टीट्युट, सोलापूरचे संचालक संजय नवले, फेन्सिंग असो. ऑफ इंडियाचे खजिनदार अशोक दुधारे, संत श्री जनार्दन स्वामी महाराज ट्रस्टचे ट्रस्टी मधुकर जेजुरकर उपस्थित राहणार आहेत.

असा आहे स्पर्धेचा कार्यक्रम :

दिनांक : २९  ते ३१ मार्च, २०१८

उदघाटन समारंभ : २९ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता स्पर्धा स्थळी

स्पर्धेची वेळ : सकाळी ०८.३० ते ११.०० दुपारी ०४.०० ते रात्री ०८.०० वाजेपर्यंत.

स्पर्धेसाठी  राष्ट्रीय पंचप्रमुख ले.कर्नल, विक्रम जमवाल (आर्मी), भुषण जाधव (महाराष्ट्र), लोहित कुमार (कर्नाटक) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील विविध राज्यांचे एकूण ४० पंच या स्पर्धासाठी काम करणार आहेत.

स्पर्धेदरम्यान भारतीय तलवारबाजी महासंघाचे सरचिटणीस बशीर खान (छत्तीसगड), उपाध्यक्ष अनघा वार्लीकर (गोवा) सहसचिव गुरमोहन सिंग (मध्य प्रदेश), कार्यकारणी सदस्य मुरली किशन (आंध्रप्रदेश), हीना शुक्ला (दिव दमन), भरत ठाकूर (गुजरात), संजय प्रधान (उत्तर प्रदेश) इ. पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. Nashik organising 5th Youth National Fencing Championship sports news

खेळाडूंच्या उत्तम व्यवस्थेची ग्वाही यावेळी आयोजकांमार्फत देण्यात आली असून पुरुष खेळाडूची निवास व्यवस्था संत जनार्धन स्वामी आश्रम औरंगाबाद रोड, तपोवन, पंचवटी नाशिक येथे करण्यात आली आहे तर महिला खेळाडूंची व्यवस्था कैलास मठ, पेठ नाका, पंचवटी नाशिक येथे करण्यात आली आहे. खेळाडूंची रेल्वे स्टेशन ते निवास व्यवस्था यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिला खेळाडूंची निवास व्यवस्था ते स्पर्धा स्थळ ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

छत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

स्पर्धेचा उदघाटन प्रसंगी तलवारबाजीतील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शिवछत्रपती मार्गदर्शक राजू शिंदे (नाशिक), शिवछत्रपती संघटक राजकुमार सोमवंशी (उस्मानाबाद), विलास वाघ (ठाणे), डॉ. प्रदीप तळवेलकर(जळगाव), दत्ता गलाले (लातूर), शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अस्मिता दुधारे( नाशिक), स्वप्नील तांगडे(औरंगाबाद), शरयू पाटील(नाशिक), स्नेहल पवार (ठाणे), सागर मगरे (औरंगाबाद) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी दत्ता पाटील, राजू शिंदे, आनंद खरे, नितीन हिंगमिरे, दिपक निकम, मनिषा काटे, राजू जाधव, पांडुरंग गुरव , मधुकर देशमुख, कुणाल अहिरे, विक्रम दुधारे, राहुल फडोळ आदी प्रयत्नशिल आहेत.

Nashik organising 5th Youth National Fencing Championship sports news

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.