Orange Ration Card Maharashtra केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी सवलतीच्या दराने धान्य वाटप


नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील केशरी शिधापत्रिकाधारक ज्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षेत समावेश झालेला नाही, अशा लाभार्थ्यांना कोरोनाच्या अनुषंगाने घोषित केलेल्या टाळेबंदीच्या काळातिल रेशन वाटपाला जिल्हा पुरवठा विभागाने सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील गोरगरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे. Orange Ration Card Maharashtra

करोना संकटामुळे देशभरात मार्च अखेरपासून लाॅकडाऊन सुरु आहे. त्यात गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून रेशन लाभार्थ्यांना तीन महिन्याचे राशन अगाऊ दिले जात आहे. त्यामुळे अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची उपासमार टळली आहे.

महानगरपालिका हद्दितील केशरी शिधा पत्रिका धारकांना रेशनच्या अन्नधान्याचा लाभ दिला जावा ही मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे व जुन महिन्या करीता प्रति व्यक्ती 3 किलो गहु व तांदूळ प्रति किलो 12 रुपये अशा सवलतीच्या दरात वाटप सुरू करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली.

त्यामुळे केसरी शिधापत्रिका धारकांची उपासमार टळणार आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील धान्य वितरण अधिकारी, कार्यक्षेत्रात येणारे सर्व केशरी शिधापत्रिकाधारक यांनी याबाबत नोंद घ्यावी. सदर केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य घेण्यास कुठलाही अडथळा येऊ नये म्हणुन धान्य वितरण अधिकारी, नाशिक कार्यालयाकडून तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

ज्या केशरी शिधापत्रिकाधारकांना दुकानाशी संबंधीत व धान्याशी संबंधीत अडचणी निर्माण होतील अशा सर्व नागरीकांनी खालील नमुद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नरसीकर यांनी केले आहे. Orange Ration Card Maharashtra

या नंबरवर संपर्क करावा
  • ए . वाय . येवले ( खैरनार ) ९९२२५८६६११
  • गणेश आव्हाड ९४०४६८८५७५
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.