कांद्याची लक्षवेधी सूचना चुकीची छापली; भुजबळांनी व्यक्त केला संताप

तर लोक जोड्याने मारतील; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

मुंबई/ नाशिक :- कांद्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना बदलून ती चुकीची छापल्याने छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत संताप व्यक्त करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालादिल झाले असल्याची लक्षवेधी छगन भुजबळ यांनी दिली होती. पण छापील लक्षवेधीत उन्हाळी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, दरवाढ नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याने भुजबळांनी रुद्रावतार धारण करून संताप व्यक्त केला. सभागृहात गोंधळ उडाला. Nashik onion rates issue lakshavedhi angry chhagan bhujbal vidhansabha

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलास द्यावा याबाबत लक्षवेधी सूचना मांडली असतांना प्रशासनाकडून कांद्याची चुकीची लक्षवेधी सूचना छापली. लक्षवेधीचा अर्थच बदलला असल्याने मतदारसंघात लोक जोड्याने मारतील अशा शब्दात भुजबळ यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, कांद्याचे दर घसरले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. ते आम्ही लक्षवेधी सूचनेत मांडले आहे. शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी मात्र लक्षवेधीत तसा उल्लेख नाही. कांद्याला योग्य दर देण्यात यावे अशी आमची आग्रही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांद्याला केवळ १ रुपये किलोदर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला असून शेतकरी आंदोलन करत आहे. तसेच एका शेतकऱ्याने कांदा विकून आलेली रक्कम थेट पंतप्रधानाना मनी ऑर्डर करून संताप व्यक्त केला आहे. एक किलो कांद्याला ८ रुपये खर्च येत असतांना शेतकऱ्याला किलोला केवळ एक रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग अधिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा अशी मागणी केली.

छगन भुजबळ यांनी सभागृहात हे प्रकरण लावून धरल्यानंतर यावेळी आ. जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.शशिकांत पाटील यांनी जाणीवपूर्वक कुणी लक्षवेधी बदलली असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली.

Nashik onion rates issue lakshavedhi angry chhagan bhujbal vidhansabha
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.