Nashik Onion Price Slips कांदा दोन हजाराच्या खाली घसरला; निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीला जोर

लासलगाव – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. 4) कांद्याचे बाजारभाव कोसळले. प्रति क्विंटलला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला. एकूण 16000 क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन सोमवारच्या (ता. 3) तुलनेत 450 रुपयांनी बाजारभाव घटले आहेत. मनमाड, कळवण, उमराणे, निफाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. Nashik Onion Price Slips

गेल्या मोसमात नोव्हेंबर पर्यंत पावसाची हजेरी राहिल्याने कांद्याचे भाव 20000 रुपये प्रति क्विंटल नोंदवले गेले. त्यानंतर उपाययोजना म्हणून निर्यातबंदी, साठवणुकीवर निर्बंध, परदेशातून मागावलेला कांदा यामुळे कांद्याचे बाजारभाव सतत चढे राहिले. असे असले तरी यात खऱ्या अर्थाने छोटा शेतकरी भरडला जात आहे. भाव वाढले तेव्हा त्याच्याकडे कांदा नव्हता तर आता कांदा आहे पण भाव घसरत आहेत.

परंतु आता नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून भाव पाडण्यासाठी आणलेल्या उपयोजना अजूनही तशाच ठेवल्याने कांद्याचे भाव कोसळत आहेत. मागील आठवड्यात 3000 पेक्षा जास्त भाव घेणारा लाल कांदा आता शेतकऱ्यांना रडवण्याच्या स्थितीपर्यंत येऊन पोहचला असूनही सरकारी पातळीवर कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत.

परदेशातून मागवल्या कांद्याची बिकट अवस्था असून तो 86 रुपये प्रतिकिलो या भावाने आला आहे. त्या कांद्याला कोणीही हात लावण्यास धजावताना दिसत नाही. तो कांदा वाया जाण्याची भीती असून देशांतर्गत गरज भागवण्यापुरता कांदा बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने कांदा भाव गडगडतील अशी शक्यता होती.

त्याच अनुषंगाने काही दिवसापूर्वीच नाशिक कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कांदा निर्यातबंदी हटवण्यासाठी केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे. त्यात आंदोलन लरण्याचाही इशारा देण्यात आला असून आता खरच तशी परिस्थिती येऊ घातली आहे की काय असे वाटतेय.

onion export ban farmers निर्यातबंदी काढावी; अन्यथा तीव्र आंदोलन – कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

निर्यात बंदी अंशतः उठवण्याची आवश्यकता असताना कांदा साठा करण्याची मर्यादाही लागू आहेत. त्यामुळे खरेदीदार व्यापारी नाराज झाले आहेत.  

लासलगाव बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी विक्री होत आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच
शुक्रवारी (ता. 31) सकाळी कांद्याची विक्री प्रति क्विंटलला 3000 रुपयापर्यंत होती. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने आता शेतकऱ्यांत संतापाची भावना निर्माण होत आहे.

कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यातही कांद्याची आवक वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. कर्नाटकातील कांद्याला काही प्रमाणात निर्यातीची मुभा दिलेली असताना परदेशात चांगली मागणी असलेल्या महाराष्ट्रातील कांद्यावर अन्याय होत असल्याचे चित्र आहे. Nashik Onion Price Slips

इथे क्लीक करून बघा आजचा कांदा भाव – 4 Feb 2020

रोजचा बाजारभाव व्हाट्सअप वर मिळविण्यासाठी इथे क्लीक करा.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.