पूणतांबेचा पत्ता कट: शेतकरी संपाचे नाशिक नवे केंद्र, उद्या बैठक

Share this with your friends and family

नाशिक : पूणतांबे जि. नगर येथील कोअर कमिटीच्या सदस्यांनी विश्वासात न घेता संपातून माघार घेतली असा आरोप करत या निर्णयाला नाशिकसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विरोध नोंदविला आहे.

याच पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ४ जून) राज्यभरातील शेतकरी, विविध शेतकरी संघटनांचे नेते यांची बैठक नाशिक येथे होणार असून यात आंदोलनाची पुढची भूमिका ठरविण्यात येणार आहे. यात पूणतांबे गावातील शेतकरीही उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पूणतांबेचा पत्ता कट होऊन शेतकरी संपाचे नाशिक नवे केंद्र बनण्याची चिन्हे आहेत.

इथे बघा व्हिडीओ… हंसराज वडघुले यांनी शेतकऱ्यांसमोर ठराव जाहीर केला…

आज पहाटे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चार तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर अचानक संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. कोणताही ठोस निर्णय न घेता केवळ आश्वासनांवर भुलवन करण्यात आल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट दिसून आली.

आजच्या (दि. ३ जून) बैठकीत  नाशिकमध्ये हा निर्णय कोणत्याही पक्षाने, नेत्याने घेतलेला नसून शेतकऱ्यांनी उस्फूर्तपणे घेतला आहे. कालच्या चर्चेला आणि त्यानंतर झालेल्या कोणत्याही निर्णयाला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अजिबात समर्थन नसल्याचे सांगण्यात आले आहे.
संपातून माघार घेण्याच्या निर्णयाला मंजुरी नाही. उद्या दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीत काही निर्णय होईपर्यंत हा संप चालू ठेवण्याचा ठरावही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यभरातील शेतकरी नेत्यांच्या उपस्थिती होणाऱ्या या बैठकीस कोणात्याही राजकीय पक्षातील नेत्यांना येण्याची मुभा देण्यात आली असून या नेत्यांना शेतकरी संपाविषयीची राजकीय वैयक्तिक भूमिका स्पष्ट मांडता येणार आहे. शेतकरी चळवळीत काय करणार आहात हे स्पष्ट करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सत्ताधारी आमदार खासदारांशी चर्चा नाहीच…

ही बैठक आणि त्या आधी झालेला गोंधळ यादरम्यान भाजप आमदार देवयानी फरांदे तेथे उपस्थित होत्या. मात्र त्यांच्याशी चर्चा करायला कोणीही शेतकरी किंवा नेता गेला नाही. बैठक चालू असताना आमदार बाळासाहेब सानप, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण तेथे आले. सर्व ठराव करण्यात आल्यानंतर या उपस्थित सत्ताधारी नेत्यांशी शेतकरी बोलतील अशी परिस्थिती असतानाच शेतकऱ्यांनी बैठक संपवत माध्यमांशी बोलण्याला पसंती दिली.

नाशिकमध्ये याचा उद्रेक बघावयास मिळाला. सकाळीच संप मागे घेण्यात आल्याच्या वृत्ताने नाशिक बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरू करण्यासाठी दुकाने उघडली. तेव्हा त्यांचा संपाशी ठाम असलेल्या शेतकऱ्यांशी संघर्ष उडाला. काही मालाची फेकाफेक करण्याचा प्रयत्न केल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

हा ठराव बोलणारे हंसराज वडघुले यांनी शेतकऱ्यांकडून वदवून घेतला. यावेळी अमृता पवार, हेमलता पाटील राजू देसले माजी आमदार शिरीष कोतवाल, तालुका प्रतिनिधी बैठकीदरम्यान उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.